मुंबई : रशिया व युक्रेनमधील युद्धामुळे सारे जग चिंतेत पडले आहे. रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेन पुरता बेचिराख झालाय.. एका निसर्गसंपन्न, स्वच्छ-सुंदर देशात आता फक्त इमारतींचे सांगाडे दिसत आहेत. रस्ते निर्मनुष्य झाले असून, वातावरणात एक प्रकारची दहशत, घबराट पसरली आहे.. खरं तर हा एक संपन्न देश. आनंदी जीवन जगणाऱ्या लोकांचा देश… मात्र, आता तेथे फक्त भीती पाहायला मिळते.. युक्रेनबाबत माहिती नसलेल्या गोष्टी आज जाणून घेऊ या..
1990 मध्ये सोव्हिएत युनियनपासून वेगळे झाल्यानंतर युक्रेन एक वेगळा देश म्हणून समोर आला. येथील लोक मोठ्या प्रमाणात शेती करतात. शेतीतून त्यांना चांगले उत्पन्नही मिळते. शेती उत्पादनाबाबत ते जगात तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, परंतु येथील सुशिक्षित लोकही शेती व्यवसायात उतरले आहेत नि आधुनिक शेतीतून ते भरघोस पीक देखील मिळवतात.
युक्रेनच्या पूर्वेला रशिया, उत्तरेला बेलारूस, पोलंड, स्लोव्हाकिया, पश्चिमेस हंगेरी, नैऋत्येस रोमानिया आणि मोल्दोव्हा, तसेच दक्षिणेस काळा समुद्र नि अझोव्ह समुद्र आहे. सोव्हिएत युनियनच्या फाळणीनंतर, युक्रेनला 7,80,000 लष्करी शक्तीसह जगातील तिसरा सर्वात मोठा अण्वस्त्र शस्त्रागाराचा वारसा मिळाला. रशियानंतर युरोपमधील हा सर्वात मोठा लष्करी शक्ती असणारा देश आहे. येथे जवळ-जवळ प्रत्येक घरातील माणसाला एकदा तरी सैन्यात भरती व्हावे लागते..
सोव्हिएत युनियनमध्ये असतानाही युक्रेनची झपाट्याने वाढ झाली, परंतु वेगळे झाल्यानंतरही त्याचा विकासाचा वेग मंदावला नाही.. येथील शहरे सुंदर व स्वच्छ राहतात. कीव ही युक्रेनची राजधानी. तसेच विमान बनवण्यासाठीही युक्रेन प्रसिद्ध आहे. जगातील सर्वात मोठे विमानही येथेच बनले.
युक्रेनमधील बहुसंख्य लोकसंख्या ख्रिश्चन असून, ते युक्रेनियन भाषा बोलतात. त्यानंतर येथे दुसऱ्या क्रमांकावर मुस्लिम लोकसंख्या आहे. युक्रेनमध्ये 7 अशी ठिकाणे आहेत, जी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत येतात. त्यात कीवचे ‘सेंट सोफिया कॅथेड्रल’ आणि ल्विव्हचे ऐतिहासिक केंद्रही येते. चेरनिव्त्सी विद्यापीठात एक खास प्रकारचे लाकडी चर्च आहे, येथील समुद्राला लागून असलेले जंगलही खास आहे. एकूणच हा देश निसर्ग सौंदर्यासाठी ओळखला जातो.
युक्रेनची सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही फार सुनियोजित आहे. इथले प्रत्येक गावं अगदी ते लहान असलं, तरी रेल्वे नेटवर्कने जोडलेलं आहे. त्यामुळे येथील लोकांना दळण-वळण करणे खूपच सोपे झालेय. अनेक शहरांमध्ये स्वस्त बस आणि ट्राम सुविधा आहे. येथे अनेक विमानतळ आहेत नि त्यांची तिकीटेही स्वस्त आहेत.
राजधानी कीवमध्ये मेट्रो ट्रेनचे जाळे आहे. कीवची ‘स्वितोशिन्को ब्रोवर्स्का ट्रेन लाइन’ ही जगातील सर्वात खोल भुयारी मार्ग आहे, जी जमिनीखाली 105.5 मीटरवर आहे. त्यातील बहुतांश मेट्रो स्थानकेही जमिनीखाली आहेत. येथे वर आणि खाली जाणारे ‘एस्केलेटर’ खूप लांब नि भीतीदायकही आहेत.
युक्रेनच्या खाद्यसंस्कृतीविषयी बोलायचे झाल्यास, येथे चिकन, डुकराचे मांस, अंडी, मासे आणि मशरूम मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. शिवाय युक्रेनचे लोक भरपूर बटाटे, धान्ये आणि ताज्या भाज्या व फळे खातात. खाण्याव्यतिरिक्त त्यांना वाईन नि बिअर खूप आवडते. युक्रेनच्या ब्रेडच्या व्हरायटीही प्रसिद्ध आहेत. युरोपातील इतर देशांमध्येही त्याची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. तसेच या लोकांना चीजही खूप आवडते. येथे दर 100 मीटरवर तुम्हाला एक तरी कॅफे पाहायला मिळेल.
युक्रेनमधील मुलींची गणना जगातील सर्वात सुंदर मुलींमध्ये होते. ते मैत्रीपूर्ण आहेत आणि प्रेम करण्यास देखील पात्र आहेत. येथे डेटिंग करणं सामान्य मानलं जातं, परंतु येथील मुलीही इथल्या लोकांप्रमाणेच भावनिक आणि मूडी असू शकतात. मुलींचा पोशाख स्मार्ट असतो. साधारणपणे इथल्या मुलींना आपलं आयुष्य त्यांच्या मर्जीनुसार घालवण्याचं स्वातंत्र्य आहे.
Shane Warne Death: शेन वॉर्नच्या मृत्यूबाबत थायलंड पोलिसांचा मोठा खुलासा; म्हणाले…
Corona Update : कोरोनाचा विळखा होतोय कमी; 24 तासांत सापडलेत फक्त ‘इतके’ नवे रुग्ण..