Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

निवडणुकांनंतर महागाईचा पहिला झटका..! 8 मार्चपासून ‘या’ इंधनाची दरवाढ; पहा, कुठे वाढतेय महागाई..?

दिल्ली : देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपल्यानंतर ज्याबाबत अंदाज व्यक्त करण्यात येत होता तसे घडताना दिसत आहे. इंधन दरवाढीचा पहिला दणका दिल्ली एनसीआरमधील (Delhi NCR) लोकांना बसणार आहे. ही दरवाढ पेट्रोल-डिझेलची नाही तर सीएनजीमध्ये होणार आहे. निवडणुकांनंतर सरकारने सर्वात आधी सीएनजीच्या दरात वाढ करून महागाईचा झटका दिला आहे. दिल्ली एनसीआरमध्ये 8 मार्च म्हणजेच मंगळवारपासून सीएनजी दरवाढ होणार आहे.

Advertisement

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिल्ली-एनसीआरमध्ये सीएनजीच्या किमतीत (CNG Price) 1 रुपयांनी वाढ झाली आहे. दिल्ली एनसीआरमध्ये मंगळवारी सकाळी 6 वाजल्यापासून वाढलेल्या किमती लागू होतील. दिल्लीत सीएनजीच्या दरात 50 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर दिल्लीत सीएनजीची नवीन किंमत 57.1 ऐवजी 57.51 रुपये प्रति किलो होईल.

Advertisement

त्याचवेळी दिल्ली ते गाझियाबाद, नोएडा आणि ग्रेटर नोएडापर्यंत सीएनजीच्या किमतीत 1 रुपयांनी वाढ झाली आहे. एनसीआरमध्ये सध्याची किंमत 58.58 रुपये प्रति किलो आहे, मंगळवारपासून नवीन किंमत 59.58 रुपये प्रति किलो होईल. दिल्ली एनसीआरमधील हरियाणा राज्याबद्दल सांगितले तर इथेही ते खर्चिक होणार आहे. गुरुग्राममध्ये सीएनजीची किंमत 65.88 रुपये, रेवाडीमध्ये 67.98 रुपये, करनाल आणि कैथलमध्ये 66.18 रुपये असेल.

Loading...
Advertisement

दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात जगभरातील खाद्यपदार्थांच्या किमतीने विक्रमी पातळी गाठली आहे. United Nations ची संघटना असलेल्या अन्न आणि कृषी संघटनेने (FAO) ही माहिती दिली. अहवालानुसार, गेल्या वर्षाच्या तुलनेत जागतिक खाद्यपदार्थांच्या किमतीत 21 टक्क्यांनी वाढ झाली आहे. खाद्यतेल आणि दुग्धजन्य पदार्थांच्या किमती वाढल्याने ही वाढ झाल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. कोरोनानंतर बिघडलेल्या परिस्थितीमुळे अन्न उत्पादन अजूनही सावरलेले नाही, तर रशिया आणि युक्रेनमधील परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. पुरवठ्यावर परिणाम झाल्याने दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

Advertisement

5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल 10 मार्च रोजी जाहीर होणार आहेत. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसे पाहिले तर रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलांच्या किंमती प्रति बॅरल 120 डॉलरच्याही पुढे गेल्या आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात किंमती वाढल्यानंतरही देशात इंधनाचे दर स्थिर आहेत. यामागे विधानसभा निवडणुका असल्याचे सांगण्यात येत होते. आता मात्र निवडणुकांनंतर इंधनाचे दर वाढण्याचा अंदाज आहे. आता किती रुपये दरवाढ होते हे पाहणे महत्वाचे ठरणाक आहे.

Advertisement

महागाई जोरात..! फक्त एकाच वर्षात जगभरात खाद्य पदार्थांच्या किंमतीत मोठी वाढ; पहा, कुणी केलाय हा खुलासा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply