आजही सोन्या-चांदीच्या दरात जबरदस्त वाढ..! रशिया-युक्रेन युद्धाचा होतोय ‘असा’ ही इफेक्ट; चेक करा, डिटेल..
दिल्ली : सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा वाढ झाली. सोन्याच्या मजबूत आंतरराष्ट्रीय किमती आणि रुपयातील तीव्र घसरण यामुळे सोमवारी राष्ट्रीय राजधानीत सोन्याचा भाव 1,298 रुपयांनी वाढून 53,784 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. मागील व्यवहारात सोने 52,486 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. चांदीचा भावही 1,910 रुपयांनी वाढून 70,977 रुपयांवर पोहोचला, जो मागील व्यवहारात 69,067 रुपये प्रति किलो होता.
सोमवारी, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 84 पैशांनी घसरून 77.01 वर बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,996 डॉलर प्रति औंस आणि चांदीचा भाव 25.81 डॉलर प्रति औंस होता. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, रशिया आणि युक्रेनमधील वाढत्या तणावामुळे सोमवारच्या व्यापारात सोन्याचा भाव $2,000 प्रति औंसच्या वर गेला.
रशियाच्या तेल आयातीवर निर्बंध लादण्याचा विचार करून अमेरिकेने कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ केली असून युरोपीय देशांनी 14 वर्षांच्या उच्चांकावर व्यापार केला आहे. रशिया हा प्रमुख तेल उत्पादक आणि निर्यातदार देश आहे. रशियन तेलावरील निर्बंधांमुळे जागतिक बाजारपेठेत तेलाची प्रचंड कमतरता निर्माण होईल. तेलाच्या किमती वाढल्याने ऊर्जेच्या किमती वाढतील, ज्यामुळे भारतासारख्या तेल आयातदार देशांमध्ये महागाई मोठ्या प्रमाणात वाढेल. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने वित्तीय तूट वाढेल, असाही अंदाज आहे. चलनातील घसरण हे एक संकेत आहे की सध्या कच्च्या तेलाच्या किमतीत कोणतीही घट होणार नाही, येत्या काही काळासाठी आपण किमतीत वाढ पाहू शकतो.
दरम्यान, रशियाने युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारले आहे. रशिया-युक्रेन संकटाचा थेट परिणाम जागतिक बाजारासह देशांतर्गत सराफा बाजारावर दिसून येत आहे. वाढती महागाई, कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ आणि भू-राजकीय तणाव या कारणांमुळे देशांतर्गत सोने मार्केटमध्ये सोन्याच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
केडिया अॅडव्हायजरीचे संचालक अजय केडिया सांगतात की, सध्याच्या परिस्थितीमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा स्थितीत सुरक्षित गुंतवणुकीच्या दृष्टीने सोन्याकडे कल वाढेल, ज्यामुळे देशांतर्गत बाजारात सोने या वर्षाच्या अखेरीस 58000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे पोहोचण्याची शक्यता आहे. परिस्थिती आणखी बिघडल्यास किंमती 60 हजार रुपयांच्या पुढे जाऊ शकतात.
सोने लवकरच गाठणार ‘तो’ टप्पा.. सोने-चांदी खरेदीआधी जाणून घ्या काय आहेत नवीन भाव..