Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

काम की बात : दुचाकी-कारचे मायलेज किती ? ; ‘या’ सोप्या पद्धतीने करा चेक; वाचा, महत्वाची माहिती..

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. वाढत्या खर्चामुळे आता प्रत्येक जण वाहनांच्या मायलेजकडे जास्त लक्ष देत आहेत. तसेच लोक वाहने खरेदी करताना कमी पेट्रोलमध्ये जास्त मायलेज देणारी वाहने खरेदी करत आहेत. अशा परिस्थितीत, प्रत्येकाला आपल्या दुचाकी किंवा कारचे मायलेज काय आहे हे जाणून घ्यायचे आहे. ज्याची माहिती अगदी नवीन आणि आधुनिक कार डिस्प्लेद्वारे मिळू शकत नाहीत. वाहनाच्या डिस्प्लेद्वारे मिळणारी माहिती प्रत्यक्षात वेगळी आहे आणि या माहितीत अनेक त्रुटी सुद्धा असतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कार आणि दुचाकीचे मायलेज जाणून घेण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत.

Advertisement

1. योग्य मायलेज माहितीसाठी, तुम्ही प्रथम तुमच्या दुचाकी किंवा कारची टाकी भरली पाहिजे. तथापि, याआधी आपल्या वाहनातील इंधन संपवा. टाकी पूर्णपणे रिकामी झाल्यानंतर टाकीत इंधन भरा. यामुळे पेट्रोलबाबत योग्य माहिती मिळण्यास मदत होईल.

Advertisement

2. टाकी भरल्यानंतर, जेव्हा त्यातील इंधन संपणार असे लक्षात येते तेव्हा ताबडतोब इंधन भरून घ्या. तसेच, ओडोमीटरवर दर्शविलेल्या किलोमीटरची संख्या लक्षात ठेवा. त्याच वेळी, जर कारमध्ये ट्रिप मीटर असेल तर ते शून्यावर आणा.

Advertisement

3. यानंतर, दिवसाच्या हिशोबाने वाहनांचा वापर करा. जेव्हा तुम्ही वाहनाची टाकी भरण्यासाठी जाल तेव्हा या टिप्स लक्षात ठेवा. या दरम्यान तुमच्याकडे नेमके किती पेट्रोल आहे ते नोंदवा.

Loading...
Advertisement

4. कार किंवा दुचाकीची इंधन टाकी रिझर्व्हपर्यंत येताच, तुम्ही तुमच्या जवळच्या पेट्रोल पंपावर पुन्हा टाकीमध्ये इंधन भरून घ्या. याबाबत एक नोट तयाडर करा आणि नंतर शेवटी लिहिलेल्या वाहनाच्या किलोमीटर आणि इंधन लिटरची तुलना करा. उदाहरणार्थ, जर एखादी कार किंवा दुचाकी 20 लिटर पेट्रोलमध्ये 300 किमी चालली असेल, तर या प्रकरणात 15 किमी प्रति लिटर मायलेज मिळते.

Advertisement

5. पुन्हा एकदा इंधन टाकी भरून घ्या आणि या पुन्हा पद्धतीने कार्यवाही करा. अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या दुचाकी किंवा कारची योग्य माहिती मिळू शकते. याशिवाय वाहनाचे मायलेज सुधारण्यासाठी तुम्ही वेळोवेळी देखभाल आणि इंजिनची विशेष काळजी घेतली पाहिजे.

Advertisement

पेट्रोलचे टेन्शन होईल कमी..! ‘या’ आहेत बेस्ट मायलेज देणाऱ्या मोटारसायकल; किंमतही आहे बजेटमध्ये

Advertisement
Advertisement

Leave a Reply