Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

दमदार प्लान..! 40GB बरोबर 150GB डेटा मोफत; पहा, किती पैसे होतील खर्च; जाणून घ्या, डिटेल..

मुंबई : सध्या प्रीपेड प्रमाणेच पोस्टपेड रिचार्ज प्लान्सनाही मागणी वाढली आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे इंटरनेटची वाढती मागणी. दैनंदीन डेटा प्लानमध्ये इंटरनेट मिळते. मात्र, त्याला मर्यादा येतात. दिवसभरातील डेटा मर्यादा संपली की नवीन डेटासाठी पैसे खर्च करावे लागतात. कामकाजातही अडचणी येतात. अशा परिस्थितीत अनेक लोक त्यांचे प्रीपेड नंबर पोस्टपेड करून घेत आहेत. कंपन्यांनी या गोष्टींचा विचार करुन पोस्टपेड प्लानही आणले आहेत.

Advertisement

दूरसंचार कंपनी Vodafone-Idea (Vi) काही उत्कृष्ट पोस्टपेड प्लॅन ऑफर करत आहे. 399 रुपयांची योजना त्यापैकी एक आहे. या प्लानमध्ये कंपनी 40 जीबी डेटासह 150 जीबी अतिरिक्त डेटा मोफत देत आहे. याबरोबरच, आम्ही तुम्हाला Vodafone-Idea च्या आणखी काही पोस्टपेड प्लॅनची ​​माहिती देखील देऊ जेणेकरून तुम्ही तुमच्यासाठी सर्वोत्तम प्लान घेऊ शकाल.

Advertisement

Vodafone-Idea ची ही पोस्टपेड योजना सर्वाधिक विक्री होणाऱ्या प्लॅनपैकी एक आहे. या प्लॅनमध्ये कंपनी इंटरनेट वापरासाठी 40 जीबी डेटा देत आहे. विशेष म्हणजे, या प्लॅनमध्ये तुम्हाला 150 GB अतिरिक्त फ्री डेटासह 200 GB पर्यंत डेटा रोलओव्हरचा लाभही मिळेल. या प्लॅनमध्ये 100 मोफत एसएमएस आणि मासिक अमर्यादित कॉल देखील उपलब्ध आहे. कंपनी या प्लॅनच्या सदस्यांना Vi Movies आणि TV चे मोफत सबस्क्रिप्शन देखील देत आहे.

Loading...
Advertisement

499 रुपयांचा प्लान
कंपनी या पोस्टपेड प्लानमध्ये 75GB डेटा देत आहे. हा प्लान 200 GB पर्यंत डेटा रोलओव्हर बेनिफिटसह येतो. प्लॅनमध्ये मासिक 100 मोफत एसएमएस आणि अमर्यादित कॉल देखील दिले जात आहे. कंपनीचा हा प्लान Amazon Prime आणि Disney + Hotstar च्या एका वर्षाच्या मोफत सबस्क्रिप्शनसह येतो.

Advertisement

699 रुपयांचा प्लान
या प्लानमध्ये कंपनी यूजर्सना इंटरनेट वापरण्यासाठी अनलिमिटेड डेटा देत आहे. प्लॅनमध्ये तुम्हाला मोफत कॉल आणि मासिक 100 मोफत एसएमएस मिळतील. कंपनी या प्लॅनमध्ये Amazon Prime Video आणि Disney + Hotstar ला एका वर्षासाठी मोफत प्रवेश देखील देत आहे.

Advertisement

Recharge Plans : तीन कंपन्यांचे 2 GB चे रिचार्ज प्लान; तुम्हीच ठरवा कोणता प्लान ठरेल बेस्ट..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply