Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

फेब्रुवारीमध्ये वाहन कंपन्यांनी मिळालयं मोठं टेन्शन; ‘या’ सहा कंपन्यांना बसलाय जोरदार झटका..

मुंबई : देशातील आघाडीच्या 6 दुचाकी उत्पादक कंपन्यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये देशांतर्गत दुचाकी विक्री आणि निर्यात विक्रीत वर्षभरात घट नोंदवली आहे. Hero MotoCorp, Honda, TVS, Suzuki आणि Enfield ची विक्री विचारात घेता, देशांतर्गत बाजारपेठेतील एकूण विक्री 9,97,598 युनिट्स इतकी होती, जी फेब्रुवारी 2021 मध्ये विक्री झालेल्या 13,64,734 युनिट्सच्या तुलनेत 26.90 टक्क्यांनी घसरली आहे.

Advertisement

महिन्या-दर-महिन्याच्या आधारे विक्री अहवाल पाहिल्यास, जानेवारी 2022 मध्ये विक्री झालेल्या 10,87,496 युनिट्सच्या तुलनेत फेब्रुवारी 2022 मध्ये 8.27 ची घट झाली आहे. अगदी Hero MotoCorp, Honda, Bajaj आणि Suzuki यांनी गेल्या महिन्यात विक्रीत घट नोंदवली आहे.

Advertisement

Hero Motocorp
कंपनीने या वर्षाच्या फेब्रुवारीमध्ये 3,31,462 युनिट्सची विक्री केली होती, जे फेब्रुवारी 2021 मध्ये विकल्या गेलेल्या 4,84,433 युनिट्सच्या तुलनेत 31.58 टक्क्यांनी कमी आहे. महिन्या-दर-महिन्याच्या आधारावर, कंपनीने जानेवारी 2021 मध्ये 3,58,660 युनिट्सची विक्री केली, याचा अर्थ Horo च्या विक्रीत 7.58 टक्क्यांनी घट झाली, तर शेअरची टक्केवारी 32.98 टक्क्यांवरून 33.23 टक्के झाली.

Advertisement

Honda
होंडाने फेब्रुवारी 2022 मध्ये 2,85,677 दुचाकींची विक्री केली. तर गेल्या वर्षात फेब्रुवारी 2021 मध्ये Honda ने 4,11,578 दुचाकी विकल्या होत्या. होंडा टू-व्हीलरमध्ये वार्षिक आधारावर 30.59 टक्क्यांनी घट झाली आहे. बजाज चेतक, TVS iQube इलेक्ट्रिक आणि Suzuki Burgman Electric यांच्या बरोबर स्पर्धा करण्यासाठी Honda इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याच्या तयारीत आहे.

Loading...
Advertisement

TVS
TVS मोटार विक्री गेल्या महिन्यात 1,73,198 युनिट्सवर होती, जी फेब्रुवारी 2021 मध्ये विकल्या गेलेल्या 1,95,145 युनिट्सच्या तुलनेत 11.25 टक्क्यांनी कमी आहे.

Advertisement

Bajaj Auto आणि Suzuki
बजाज ऑटोने सुझुकीबरोबरच्या विक्रीत अनुक्रमे 35.19 टक्के आणि 1.56 टक्के वाढ नोंदवली आहे. मागील महिन्यात 28.76 टक्के आणि 3.33 टक्के घसरणीसह 96 हजार 523 आणि 58 हजार 603 युनिट्स विक्री करण्यात आली.

Advertisement

Royal Enfield
कंपनीने देखील गेल्या महिन्यात विक्रीत 19.93 टक्क्यांची घट नोंदवली आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये, रॉयल एनफिल्डने 52,135 वाहनांची विक्री केली, तर फेब्रुवारी 2021 मध्ये, कंपनीने 65,114 मोटारसायकलींची विक्री केली होती. कंपनीच्या वाहन विक्रीत किरकोळ घट झाली आहे. रशिया-युक्रेन युद्धा, सेमी कंडक्टर टंचाई, वाढती महागाई आणि इंधन दरवाढ या काही कारणांमुळे वाहन विक्रीला फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement

दुचाकी कंपन्यांच्या डोकेदुखीचा अहवाल आलाय; पहा, कसा झटका बसणार कंपन्यांना..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply