Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

वाव.. फक्त अडीच तासात फुल चार्ज..! आलीय एकदम हटके इलेक्ट्रिक स्कूटर; पहा, काय आहेत खास फिचर..?

मुंबई : सध्या अनेक कंपन्या नवीन इलेक्ट्रिक दुचाकी वाहने लाँच करत आहेत. आता आणखी एका कंपनीने दमदार इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. Greta Electric Scooters ने देशातील बाजारपेठेत Greta Glide नावाची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 80,000 रुपये आहे. विशेष म्हणजे, फुल चार्ज केल्यावर ही स्कूटर 100 किमी पर्यंत रेंज देते. कंपनीचा दावा आहे, की ही इलेक्ट्रिक स्कूटर फास्ट चार्जिंग लिथियम-आयन बॅटरीद्वारे 2.5 तासांपेक्षा कमी वेळेत पूर्ण चार्ज होते.

Advertisement

कंपनीने स्कूटरचे बुकिंग सुरू केले आहे. ऑफर अंतर्गत, प्री-बुक केलेल्या स्कूटरवर 6,000 ची सूट आणि स्पॉट बुक केलेल्या स्कूटरवर 2,000 रुपये सूट दिली जात आहे. ही स्कूटर सात रंगांमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे. कंपनी 3 वर्षांची बॅटरी वॉरंटी देत ​​आहे. ग्रेटा ग्लाइड इलेक्ट्रिक स्कूटर बर्‍याच परफॉर्मन्स आणि सुरक्षा वैशिष्ट्यांसह येते. वैशिष्ट्यांच्या यादीमध्ये DRL, EBS, ATA सिस्टम आणि स्मार्ट शिफ्टचा समावेश आहे. स्कूटर रिव्हर्स ड्राइव्ह मोड आणि थ्री-स्पीड ड्राइव्ह मोडला देखील सपोर्ट करते. त्याचे 3.5 इंच रुंद ट्यूबलेस टायर रस्त्यावर मजबूत पकड प्रदान करतात. ग्रेटा ग्लाइडच्या इतर वैशिष्ट्यांमध्ये एलईडी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर डिस्प्ले, कीलेस स्टार्ट, अँटी थेफ्ट अलार्म, फ्रंट ग्लोव्ह बॉक्स, लाईट डिझायनर कन्सोल यांचा समावेश आहे.

Advertisement

दरम्यान, देशात इलेक्ट्रिक वाहनांना अद्याप अपेक्षित प्रमाणात मागणी नाही. चार्जिंग स्टेशनची कमतरती हे महत्वाचे कारण यामागे असल्याचे सांगण्यात येत आहे. चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहेत. त्यानंतर आता खासगी कंपन्याही मदत करण्यास पुढे येत आहेत. देशातील इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रातील आघाडीची कंपनी ओला इलेक्ट्रिक देशभरात ‘हायपरचार्जर्स’ नावाने चार्जिंग नेटवर्क उभारणार आहे. या ‘हायपरचार्जर’च्या मदतीने ओला ई-स्कूटर 18 मिनिटांत 50 टक्के चार्ज होऊ शकते. कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी काही दिवसांपूर्वी ही माहिती दिली होती.

Loading...
Advertisement

त्यांनी सांगितले होते, की कंपनी आगामी काळात चार्जिंग पायाभूत सुविधांचा विस्तार करणार आहे. ओलाने यावर्षी आपली इलेक्ट्रिक स्कूटर ओला एस1 आणि ओला एस1 प्रो लाँच केली. कंपनीने अलीकडेच देशातील काही शहरांमध्ये त्यांचे वितरण सुरू केले आहे. सोशल मीडियावर याची घोषणा करताना अग्रवाल म्हणाले होते की, ओला इलेक्ट्रिकचे भारतात 4 हजारांपेक्षा जास्त अधिक चार्जिंग पॉइंट्स स्थापित करण्याचे उद्दिष्ट आहे. हायपरचार्जर प्रथम BPCL पेट्रोल पंपासारख्या सार्वजनिक ठिकाणी बसवले जात आहेत. त्यासोबतच निवासी संकुलात बसविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Advertisement

वाव.. एका वेळी चार्ज होणार तब्बल 1000 इलेक्ट्रिक कार.. ‘या’ शहरात आहे सर्वात मोठे चार्जिंग स्टेशन

Advertisement
Advertisement

Leave a Reply