Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Russia-Ukraine War : रशिया विरोधात कंपन्यांचा मोठा प्लान..! आता ‘या’ दिग्गज कंपनीने दिलाय जबर दणका; जाणून घ्या..

दिल्ली : रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध अजूनही सुरुच आहे. या युद्धास रशियाला जबाबदार धरुन अनेक देशांनी रशियावर कठोर आर्थिक निर्बंध टाकले आहेत. अनेक दिग्गज कंपन्यांनीही रशिया बरोबरील व्यापारी संबंध तोडले आहेत. यामध्ये आता जगातील दिग्गज टेक कंपनी मायक्रोसॉफ्टची भर पडली आहे. कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे, की ते रशियामधील त्यांची उत्पादने आणि सेवांची विक्री बंद करत आहेत. याआधी पाश्चात्य देशांची सरकारे, विवध संघटना आणि बड्या कंपन्यांनीही रशियाच्या या कृत्याचा निषेध केला असून अनेक प्रकारचे निर्बंध लादले आहेत.

Advertisement

मायक्रोसॉफ्टची ऑपरेट सिस्टम सध्या जगभरात एक अब्जाहून अधिक जण वापरतात. रशियामधील विक्री आणि सेवा बंद झाल्यामुळे लाखो वापरकर्ते प्रभावित होतील. मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष ब्रॅड स्मिथ यांनी ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, “जगातील इतर देशांप्रमाणेच आम्हीही युक्रेनमधील युद्धाच्या बातम्यांमुळे भयभीत, संतप्त आणि दु:खी आहोत. आम्ही रशियाच्या या अन्याय्य आणि बेकायदेशीर आक्रमणाचा निषेध करतो.

Advertisement

गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला Apple ने सांगितले की त्यांनी रशियामध्ये त्यांच्या सर्व उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. रशियामध्ये आपल्या उत्पादनाची विक्री थांबवण्याबरोबरच, Apple ने रशियन न्यूज अॅप RT आणि Sputnik चे अॅप देखील आपल्या App Store मधून काढून टाकले आहेत. युक्रेनचे उपपंतप्रधानांच्या पत्रानंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हमल्यानंतर अमेरिकेने रशियाला आपल्या उत्पादनांच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. ज्यांचे ब्रँड रशियाचे आहेत, मात्र उत्पादन अमेरिकेत होते, अशा उत्पादनांवरही अमेरिकेने ही बंदी घातली आहे. या बंदीमुळे अमेरिकन कंपन्यांचे मोठे नुकसान होऊ शकते.

Loading...
Advertisement

अमेरिकेच्या व्यापार कायद्यानुसार अमेरिकेने हे निर्बंध लादले आहेत. अमेरिकन कंपन्यांनी आता रशियाला संगणक, सेन्सर, लेझर, नेव्हिगेशन उपकरणे आणि दूरसंचार, एरोस्पेस आणि सागरी उपकरणे विकण्यासाठी परवाने घेणे आवश्यक आहे. अमेरिकेने याआधी चीनी कंपनी Huawei वर अशीच बंदी घातली होती, ज्यामुळे Huawei चे खूप नुकसान झाले होते.

Advertisement

अमेरिका चीनला मोठा झटका देण्याच्या तयारीत..! पहा, चीनच्या विरोधात कोणता नवा प्रस्ताव आलाय..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply