Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

खाद्यतेलांचे टेन्शन घेऊ नका..! पहा, ‘त्यांच्या’ कडून सरकारला काय मिळालयं आश्वासन..?

दिल्ली : रशिया-युक्रेन युद्धामुळे खाद्यतेलाचा पुरवठा विस्कळीत होणार नाही. खरे तर, खाद्यतेल उद्योगाने सरकारला आश्वासन दिले आहे की ते पुढील दोन महिने सूर्यफूल आणि इतर खाद्यतेलांचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित करेल. युक्रेनमधून मोठ्या प्रमाणात सूर्यफूल तेल देशात आयात केले जाते. मात्र, रशिया-युक्रेन युद्धामुळे या देशाने तेल निर्यात जवळपास बंद केली आहे.

Advertisement

अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या बैठकीत सूर्यफूल तेलासह खाद्यतेलाच्या पुरवठ्याच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांत खाद्यतेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीबाबतही मंत्रालयाने माहिती घेतली. सूत्रांनी सांगितले की, बैठकी दरम्यान खाद्यतेल उद्योगाने मंत्र्यांना सांगितले, की सूर्यफूल तेलाची कमतरता नाही. मार्च डिलिव्हरीसाठी, युक्रेनमधून 1.5 लाख टन सूर्यफूल तेलाची पहिली खेप युद्धाआधी पाठवली गेली होती आणि हे तेल लवकरच मिळेल, असे अपेक्षित आहे. काळजी करण्याची गरज नाही कारण सूर्यफूल तेलासाठी देशात मोहरी आणि सोयाबीन तेलाचे पर्याय उपलब्ध आहेत.

Advertisement

“गेल्या दोन दिवसांत खाद्यतेलाच्या किमती कमी होत आहेत आणि खाद्यतेल उद्योगाने सुरळीत पुरवठा आणि किमती स्थिर ठेवण्याचे आश्वासन मंत्रालयाला दिले आहे. सूत्रांनी सांगितले, की मोहरीचे जवळपास 11 लाख टन उत्पादन होण्याची शक्यता असल्याने पुढील दोन ते तीन महिने देशात मोहरी तेलाचा पुरवठा व्यवस्थित सुरू राहिल.

Loading...
Advertisement

देशात एका महिन्यात 18 लाख टन खाद्यतेलाचा वापर होतो. यापैकी सूर्यफूल तेलाचा वाटा सुमारे 1.5-2.0 लाख टन आहे. सूर्यफूल तेलाची मागणी पूर्ण करण्यासाठी केवळ एक लाख टन सूर्यफूल तेलाची गरज आहे. त्याच वेळी, देशात खाद्यतेलाच्या 60 टक्क्यांपेक्षा जास्त तेल मागणी अन्य देशांकडून तेल खरेदी करुन पूर्ण केली जाते. जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत खाद्यतेलाच्या किंमतीवर दबाव दिसून येत आहे.

Advertisement

खाद्यतेलांच्या किंमती कमी करण्यासाठी सरकारचा आणखी एक प्लान; पहा, ‘कसा’ वाढणार पाम तेलाचा पुरवठा..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply