मुंबई : देशात सातत्याने वाढत जाणाऱ्या महागाईचा परिणाम आता अर्थव्यवस्थेवर दिसू लागला आहे. देशातील FMCG कंपन्यांनी दरवाढ केल्यामुळे त्याचा फटका लोकांना बसला आहे. महागाईच्या काळात लोकांना हा मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोरोना संकट, रशिया-युक्रेन युद्धामुळेही महागाईत भरमसाठ वाढ झाली आहे. नजीकच्या काळात महागाई कमी होण्याची शक्यताही दिसत नाही. त्यामुळे आता लोकांनीच खर्च कमी करण्यास सुरुवात केली आहे. रोज आवश्यक असणाऱ्या वस्तू आता कमी प्रमाणात वापरल्या जात आहेत. शहरी भागासह ग्रामीण भागातही हे दिसून येत आहे. एका सर्वेक्षणाद्वारे ही माहिती मिळाली आहे.
दैनंदिन वापरातील उत्पादने (FMCGs) बनवणाऱ्या कंपन्यांना 2021 मध्ये महागाईमुळे त्रास सहन करावा लागला. डेटा अॅनालिसिस फर्म NielsenIQ ने एका अहवालात म्हटले आहे की, महागाईने हैराण झालेल्या या कंपन्यांना वारंवार किमतीत वाढ करणे भाग पडले आहे.
संस्थेने प्रसिद्ध केलेल्या उद्योगाच्या आकडेवारीनुसार, 5 तिमाही सकारात्मक वाढीनंतर चलनवाढीमुळे ग्रामीण मागणीत तीव्र घट झाल्यामुळे, जलद गतीने चालणाऱ्या वस्तूंच्या विक्रीचे प्रमाण एका वर्षाआधीच्या तुलनेत 2.6% कमी झाले आहे. 2021 मध्ये, FMCG उद्योगाला आपले मार्जिन सांभाळण्यासाठी सलग तीन तिमाहीत दर वाढ करावी लागली. यामुळे 2020 च्या तुलनेत मागील वर्षात किंमत नियंत्रित वाढ 17.5 टक्क्यांवर पोहोचली होती.
दरम्यान, देशात किरकोळ महागाई वाढत आहे. जानेवारी महिन्यातील महागाईची आकडेवारी जाहीर झाली आहे. किरकोळ चलनवाढीचा दर डिसेंबर महिन्यात 5.66 टक्क्यांवरून जानेवारीमध्ये 6.01 टक्के होता. डिसेंबरसाठी किरकोळ चलनवाढ 5.66 टक्क्यांपर्यंत सुधारली आहे.
रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, जानेवारीमध्ये महागाईचा दर 6 टक्क्यांच्या आसपास असेल.रिजर्व्ह बँकेने महागाई दर 4 टक्के ठेवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. 2% मार्जिन दिले आहे. मात्र, महागाईने हा टप्पा पार केला आहे. नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाई 4.91 टक्के, ऑक्टोबरमध्ये 4.48 टक्के होती. एक वर्षाआधी डिसेंबर 2020 मध्ये किरकोळ महागाई दर 4.59 टक्के होता.
महागाई काय अन् कोरोना काय..! तरीही सरकारची चांदीच; पहा, फेब्रुवारी महिन्यात किती मिळालाय जीएसटी..?