Take a fresh look at your lifestyle.

Russia-Ukraine War : आता ब्रिटेनही नाराज; पहा, ‘त्या’ खासदाराने नेमके काय म्हटलेय भारताबाबत..

दिल्ली : युक्रेन विरोधात युद्ध सुरू केल्यामुळे जगातील अनेक देश रशियावर विविध प्रकारचे आर्थिक निर्बंध टाकत आहेत. रशियास मदत करणाऱ्या किंवा या प्रकरणी तटस्थ राहणाऱ्या देशांनाही आता अडचणीत आणण्याचे प्रकार पाश्चिमात्य आणि युरोपिय देश करत आहेत. रशियाबाबत भारताने घेतलेल्या धोरणावर अमेरिका तर नाराज आहेच. आता यामध्ये ब्रिटेनचीही भर पडली आहे. ब्रिटेनच्या एका खासदाराने रशियाच्या विरोधात मतदान केले नाही म्हणून भारताला मिळणारे परकीय अर्थ सहाय्य थांबवावे, अशी मागणी केली आहे.

Advertisement

युक्रेनवर हमला केल्याबद्दल रशियाच्या विरोधात UN सुरक्षा परिषदेत (UNSC) ठेवण्यात आलेल्या प्रस्तावांकडे भारताने सातत्याने दुर्लक्ष केले आहे. अशा परिस्थितीत भारताला देण्यात येणारी 50 मिलियन पौंडपेक्षा जास्त अर्थ सहाय्य थांबवण्यात यावे, अशी विनंती ब्रिटेनचे खासदार जॉन मर्सर यांनी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याकडे केली आहे, असे वृत्त द इंडिपेंडंटने दिले आहे.

Advertisement

मर्सरने याबाबत ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे, की ब्रिटनने भारताला दिलेली ही देणगी बंद करावी, कारण यामागे अनेक कारणे आहेत. आम्ही भारताला 55.3 दशलक्ष पौंड परदेशी मदत म्हणून देत आहोत. मी परकीय मदतीचा खंबीर समर्थक आहे आणि मदत कमी केली म्हणून या सरकारच्या विरोधात मतदानही केले आहे. त्याच वेळी, जर आम्ही पुतिनच्या साथीदारांवर निर्बंध टाकण्यास मान्यता दिली, तर ही मदत सुद्धा बंद करण्याची वेळ आता आली आहे.

Advertisement

दरम्यान, रशिया आणि युक्रेनमधील युद्ध नवव्या दिवशीही सुरूच आहे. युद्धानंतर अमेरिकेसह अनेक देशांनी रशियावर निर्बंध लादले आहेत. मात्र, आता रशियानेही पलटवार सुरू केला आहे. रशियाने अमेरिकेला मोठा धक्का दिला आहे. रशियाने अमेरिकेला रॉकेट इंजिनचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दिमित्री रोगोझिन म्हणाले की अशा परिस्थितीत अमेरिकेला रॉकेट इंजिन पुरवठा करू शकत नाही. रशियाने आता 1990 पासून अमेरिकेला एकूण 122 RD-180 इंजिनांचा पुरवठा केला आहे.

Advertisement

Russia-Ukraine War : अमेरिका नाराज, तरीही भारत रशियाच्या विरोधात नाहीच.. पहा, संयुक्त राष्ट्रसंघात पुन्हा काय घडले..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply