‘आम आदमी’ ला झटका देणारा अहवाल..! म्हणून इंधनाच्या दरात वाढ करणे गरजेचे; पहा, काय म्हटलेय अहवालात..
उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत असल्याने गेल्या चार महिन्यांपासून इंधनाचे दर वाढलेले नाहीत. मात्र, आता पुढील 11 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 12 रुपयांनी वाढ होऊ शकते. आयसीआयसीआय सिक्युरिटीजने एका अहवालात ही माहिती दिली आहे.
आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या ताज्या अहवालानुसार, किरकोळ विक्रेत्यांना खर्च वसूल करण्यासाठी 16 मार्चपर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रति लिटर 12 रुपयांनी वाढ करणे आवश्यक आहे. तेल कंपन्यांचे मार्जिन जोडल्यास प्रति लिटर 15.1 रुपयांची वाढ आवश्यक आहे. ब्रोकरेज कंपनी जे.पी. मॉर्गन यांनी एका अहवालात म्हटले आहे की, “राज्यातील विधानसभा निवडणुका पुढील आठवड्यात संपतील. त्यानंतर दररोज इंधनाचे दर वाढू शकतात, असा अंदाज आहे.
अहवालानुसार, “3 मार्च 2022 रोजी वाहन इंधनाचे निव्वळ विपणन मार्जिन उणे 4.92 रुपये प्रति लिटर इतके होते. चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत आतापर्यंत ते 1.61 रुपये प्रति लिटर आहे. तथापि, इंधनाच्या सध्याच्या आंतरराष्ट्रीय किमतीवर निव्वळ मार्जिन 16 मार्च रोजी उणे 10.1 रुपये प्रति लिटर आणि 1 एप्रिल रोजी 12.6 रुपये प्रति लिटरपर्यंत खाली येऊ शकते. पेट्रोलियम मंत्रालयाच्या अंतर्गत पेट्रोलियम प्लॅनिंग अँड अॅनालिसिस विभागानुसार, 3 मार्च रोजी देशाने खरेदी केलेल्या कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $ 117.39 वर पोहोचली. ही इंधनाची किंमत 2012 नंतरची सर्वाधिक आहे.
गेल्या वर्षात नोव्हेंबरच्या सुरुवातीला, जेव्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याचे थांबले होते, तेव्हा कच्च्या तेलाची सरासरी किंमत प्रति बॅरल $81.5 इतकी होती. देशांतर्गत इंधनाच्या किमतींवर थेट आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतींचा परिणाम होतो कारण देशात एकूण 85 टक्के तेल दुसऱ्या देशांकडून खरेदी केले जाते.
सर्वसामान्यांचे विमान जमिनीवर..! विमान इंधनाच्या बाबतीत पुन्हा घडलाय ‘तो’ प्रकार; जाणून घ्या..