Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘त्यांनी’ दिलाय ज्येष्ठांना दिलासा; आता मिळणार 1,500 रुपये मासिक वेतन..!

दिल्ली : हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांनी शुक्रवारी विधानसभेत 2022-23 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. यादरम्यान त्यांनी मासिक वृद्धापकाळ निवृत्ती वेतन (Monthly Old Age Pension) 1,001 रुपयांवरून 1,500 रुपये करण्याची घोषणा केली. या सरकारचा पाचवा आणि अंतिम अर्थसंकल्प सादर करताना ठाकूर यांनी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन मिळण्याची वयोमर्यादा 70 वर्षांवरून 60 वर्षे करण्याची घोषणा केली. या पेन्शनसाठी कोणतीही उत्पन्न मर्यादा नाही.

Loading...
Advertisement

राज्याच्या अर्थमंत्रालयाचा कार्यभार सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी विधानमंडळ क्षेत्र विकास निधी सध्याच्या 1.80 कोटींवरून 2 कोटी रुपये करण्याची घोषणा केली. यामध्ये 20 लाखांची वाढ करण्यात आली आहे. डिसेंबरमध्ये राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या जाणाऱ्या या सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. ठाकूर म्हणाले की, त्यांच्या सरकारच्या काळात आमदार क्षेत्र विकास निधीत 90 लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पुढील आर्थिक वर्षासाठी आमदारांचे स्वेच्छिक अनुदान 10 लाखांवरून 12 लाख रुपये करण्याची घोषणाही त्यांनी केली. राज्यात 1000 नवीन अंगणवाडी इमारती बांधण्यात येणार असून डॉक्टरांची 500 नवीन पदे निर्माण करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

Advertisement
Advertisement

Leave a Reply