Russia-Ukraine War : आता रशियन लोकांचेही होणार आर्थिक नुकसान.. युक्रेनने तयार केलाय ‘हा’ खास प्लान..
दिल्ली : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका सर्वसामान्य नागरिकांनाही बसत लागत आहे. रशियाने ज्या प्रकारे येथील परदेशी नागरिक आणि परदेशी कंपन्यांचा पैसा जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून युक्रेननेही मोठा निर्णय घेतला आहे. युक्रेनच्या संसदेने रशियन किंवा रशियाच्या नागरिकांच्या मालकीच्या युक्रेनमधील मालमत्ता जप्त करण्यास परवानगी देणारा कायदा मंजूर केला आहे. संसदेच्या मंजुरीनंतर, युक्रेनमधील रशियाच्या नागरिकांच्या मालकीच्या सर्व कंपन्या आणि इमारती युक्रेनच्या ताब्यात येतील.
युक्रेनच्या लष्कराच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंतच्या युद्धात रशियाचे खूप नुकसान झाले आहे. त्याने 9000 सैनिक गमावले आहेत. याशिवाय, 30 विमाने, 374 कार, 217 टँक गमावले आहेत. याशिवाय त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियन सैन्याला माघार घेण्याचे आवाहन केले आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात आता रशियाचे वर्चस्व दिसून येत आहे. रशियाने युक्रेनचा 20 टक्क्यांपेक्षा जास्त भाग कब्जा आहे. गेल्या सात दिवसांत रशियन सैन्याने युक्रेनचा 1 लाख 6 हजार चौरस किलोमीटरचा भूभाग ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या आठ दिवसांपासून युक्रेनवर सुरू असलेले आक्रमण पाहता आज दोन्ही देशांमध्ये चर्चा होणार होती. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी गुरुवारी सांगितले की त्यांचा विश्वास आहे की परदेशी नेते रशियाविरुद्ध युद्धाची तयारी करत आहेत आणि ते युक्रेनमधील आपली लष्करी मोहीम सुरू ठेवतील. ते म्हणाले की, रशियाने अणुयुद्धाचा कोणताही विचार केलेला नाही.
दरम्यान, युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या तणावादरम्यान अनेक देश युक्रेनला शस्त्रे पुरवत आहेत. त्याचवेळी या युद्धामुळे युरोपमध्ये तणाव वाढला आहे. जर्मनीने आपले संरक्षण बजेट 100 अब्ज युरोपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हे त्याच्या जीडीपीच्या दोन टक्क्यांहून अधिक आहे.
Russia-Ukraine War : अमेरिकेला जशास तसे उत्तर.. रशियाने घेतलाय ‘हा’ महत्वाचा निर्णय..