आर्थिक संकटातील व्होडाफोन-आयडीया कंपनीचा नवा प्लान; ‘त्याद्वारे’ मिळवणार इतके पैसे..
मुंबई : टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आयडिया कंपनीच्या बोर्डाने गुरुवारी कंपनीच्या प्रवर्तकांकडून (ब्रिटनचा व्होडाफोन समूह आणि भारताचा आदित्य बिर्ला समूह) आणि बाह्य गुंतवणूकदारांकडून तब्बल 14,500 कोटी रुपयांचा निधी उभारण्यास मान्यता दिली. Vodafone Idea आपल्या प्रवर्तकांना किंवा त्यांच्याशी संबंधित संस्थांना 13.30 रुपये प्रति शेअर दराने प्राधान्य शेअरद्वारे 4,500 कोटी रुपये उभारेल.
व्होडाफोन समूहाचा हिस्सा 4,500 कोटी रुपयांमध्ये 3,375 कोटी रुपये असेल. व्होडाफोन समूहाने एका निवेदनात म्हटले आहे की, समूह Indus Towers मधील त्याच्या भागभांडवलाच्या आंशिक विक्रीतून मिळालेल्या निधीतून आपला हिस्सा देईल. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) वर वोडाफोन-आयडियाचे शेअर्स गुरुवारी 6.1 टक्क्यांनी वाढून 11.08 टक्क्यांवर बंद झाले.
कंपनीच्या बोर्डाने युरो पॅसिफिक सिक्युरिटीज लिमिटेड आणि प्राइम मेटल्स लिमिटेड आणि ओरियाना इन्व्हेस्टमेंट्स पीटीई लिमिटेड यांना 3,38,34,58,645 पर्यंतचे इक्विटी शेअर्स प्रति 13.30 रुपये दराने देण्यास मान्यता दिली आहे. कंपनीच्या बोर्डाने इक्विटी आणि कर्ज साधनांद्वारे अतिरिक्त 10,000 कोटी रुपये उभारण्यास मान्यता दिली आहे. व्होडाफोन समूहाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, Indus Towers मधील 2.4 टक्के हिस्सा 226.84 रुपये प्रति शेअर या दराने विक्री करुन त्यांनी 1,420 कोटी रुपये उभे केले आहेत.
दरम्यान, आर्थिक संकटात अडकलेल्या व्होडाफोन-आयडिया या दूरसंचार कंपनीच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. संकटाच्या काळात ग्राहक कंपनीपासून दूर जात आहेत. आकडेवारीनुसार, नोव्हेंबर 2021 मध्ये कंपनीने तब्बल 19 लाख ग्राहक गमावले आहेत. ग्राहकांच्या बाबतीत कंपनीला गेल्या 5 महिन्यांतील हा सर्वात मोठा धक्का आहे. या 19 लाखांपैकी सुमारे 12 लाख ग्राहक ग्रामीण भागातील होते ज्यांनी व्होडाफोन आयडिया कंपनी सोडली. याचे मुख्य कारण खराब नेटवर्क सिग्नल असल्याचे मानले जात आहे.
अहवालानुसार, कंपनीच्या ग्राहकांमध्ये सलग 36 व्या महिन्यात घट झाली आहे. आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या या कंपनीने गेल्या वर्षभरात फक्त 14 लाख नवीन 4G ग्राहक जोडले आहेत. या काळात एअरटेलने तब्बल 3.4 कोटी तर जोडले आणि जिओने 2 कोटी नवीन ग्राहक जोडले आहेत.
वाव.. दररोज 3GB तर आहेच पण, मिळणार आणखी 48GB डेटा; ‘व्होडाफोन-आयडीया’ चा ‘हा’ आहे दमदार प्लान