Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

वाव.. ‘या’ स्मार्टफोनच्या खरेदीवर मिळतोय तब्बल 5 हजार रुपये डिस्काउंट; पहा, काय आहे कंपनीची ऑफर..?

मुंबई : आता आणखी एक दिग्गज स्मार्टफोन कंपनीचा स्मार्टफोन लवकरच लाँच होणार आहे. Motorola चा नवीन प्रीमियम फोन Motorola Edge 30 Pro चा पहिला सेल उद्या म्हणजेच 4 मार्च रोजी आहे. फ्लिपकार्टवर दुपारी 12 वाजल्यापासून फोनची विक्री सुरू होईल. 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत 49,999 रुपये आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा फोन तुम्ही सेलमध्ये 5 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह खरेदी करू शकता. या सवलतीसाठी, तुम्हाला SBI च्या क्रेडिट कार्डने पैसे द्यावे लागतील.

Advertisement

कंपनीच्या फोनमध्ये 1080×2400 पिक्सेल रिजोल्यूशनसह 6.7 इंच फुल एचडी डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 144Hz च्या रीफ्रेश दर आणि 20:9 च्या रेशोसह येतो. फोन 8GB LPDDR5 RAM आणि 128GB UFS 3.1 स्टोरेजने सुसज्ज आहे. प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये Snapdragon 8 Gen 1 देत आहे. फोटोग्राफीसाठी या फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे आहेत. यामध्ये 50 मेगापिक्सेल प्राथमिक कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरचा समावेश आहे. त्याचबरोबर सेल्फीसाठी या फोनमध्ये तुम्हाला 60 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल.

Loading...
Advertisement

साइड-माउंट केलेल्या फिंगरप्रिंट सेन्सरसह सुसज्ज, हा फोन 68W जलद चार्जिंगसह 4800mAh बॅटरीने समर्थित आहे. कंपनीचा दावा आहे की या चार्जिंग तंत्रज्ञानामुळे ही बॅटरी फक्त 15 मिनिटांत 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होते. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6e, Bluetooth v5.2, GPS, NFC आणि USB Type-C सारखे पर्याय देण्यात आले आहेत.

Advertisement

फक्त 10 हजार रुपयांत मिळतात ‘हे’ बेस्ट स्मार्टफोन; पहा, काय आहे खास फिचर्स आणि किंमत..

Advertisement
Advertisement

Leave a Reply