Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

सरकारी कंपनीचा नवा प्लान..! फक्त खर्च करा ‘इतके’ पैसे अन् मिळवा ‘हे’ भन्नाट फायदे..

मुंबई : सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने एक नवीन प्लान आणला आहे. या प्लॅनमध्ये 100 दिवसांच्या वैधतेबरोबर दररोज 2GB डेटा मिळत आहे. त्याची किंमत ऐकली तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. होय, हा प्लॅन फक्त 197 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने एअरटेल, जिओ, व्होडाफोन आयडीया सारख्या खाजगी कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी हा प्लॅन आणल्याचे मानले जात आहे. या प्लान अंतर्गत यूजर्सना अनलिमिटेड कॉल 2GB डेली डेटा आणि फ्री SMS चे फायदे दिले जात आहेत. 197 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 100 दिवसांची वैधता मिळत आहे.

Advertisement

हा प्लान फायदेशीर वाटत आहे मात्र यामध्ये एक अट अशी आहे, की वैधता व्यतिरिक्त उर्वरित सेवा फक्त 18 दिवसांसाठी आहेत. म्हणजे 2GB डेटा 18 दिवसांसाठी उपलब्ध असेल. यानंतर यूजर्सना 40KBPS च्या स्पीडने डेटा मिळेल. अनलिमिटेड फ्री कॉल सुविधा संपुष्टात येईल, पण इनकमिंग कॉल येत राहतील. या प्लॅनमध्ये तुम्हाला Zing अॅप मोफत सबस्क्रिप्शनही मिळेल. एकदा हे फायदे संपले की, तुम्हाला सर्व फायद्यांसाठी पुन्हा रिचार्ज करावे लागेल. तुम्ही टॉप-अप देखील करू शकता. जे लोक जास्त इंटरनेट डेटा आणि कॉल वापर करत नाहीत अशा लोकांसाठी हा एक फायदेशीर प्लान ठरेल, असे म्हटल्यास हरकत नाही.

Loading...
Advertisement

दरम्यान, देशातील खासगी कंपन्या 4 जी नेटवर्क देतात मात्र बीएसएनएलकडे अद्याप 4 जी नेटवर्क नाही. त्यामुळे अन्य कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएलचा इंटरनेट स्पीड कमी पडतो. मात्र, आता बीएसएनएल लवकरच 4जी नेटवर्क लाँच करण्याच्या प्रयत्नात आहे. कंपनीने तशी तयारीही सुरू केली आहे  असेे घडले तर बीएसएनलचे ग्राहक वाढण्यास मदत होईल. कारण, खासगी कंपन्यांनी रिचार्ज प्लानच्या दरात भरमसाठ वाढ केली आहे. बीएसएनएलने मात्र अजूनही दरवाढ केलेली नाही. ही कंपनीसाठी जमेची बाजू आहे.

Advertisement

वाव.. BSNL च्या ‘या’ प्लानमध्ये मिळतात 3 महिने मोफत; पहा, कधी संपणार ‘ही’ खास ऑफर..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply