Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

रशिया-युक्रेन युद्धाचा इफेक्ट..! फक्त एकाच दिवसात सोन्याचे भाव ‘इतके’ वाढले; जाणून घ्या, सोने-चांदीचे आजचे भाव..

मुंबई : रशियाने युक्रेन विरोधात पुकारलेल्या युद्धाचा आज आठवा दिवस आहे. या युद्धात अजूनही कोणत्याही देशाने माघार घेतलेली नाही. युद्धातील विध्वंस सुरूच आहे. मात्र, या भयानक युद्धाचे चटके अवघ्या जगालाच बसत आहेत. तसेही युद्धाचे परिणाम कधीही चांगले होत नाही. नुकसानच होते. त्यात आताच्या आधुनिक काळात तर प्रत्येक देश दुसऱ्या देशावर काही प्रमाणात अवलंबून आहे. त्यामुळे या युद्धाचे दुष्परिणाम त्या देशांनाही सहन करावे लागत आहेत. तर दुसरीकडे जागतिक बाजारातही या युद्धाचे पडसाद उमटत आहेत. या युद्धाचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरावर पडला आहे.

Advertisement

जागतिक बाजारपेठेत सोने आणि चांदीचे भाव चांगलेच वाढले आहेत. देशात आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 47 हजार 700 रुपयांवर पोहोचला आहे. बुधवारी हा भाव 46 हजार 690 रुपये प्रति दहा ग्रॅम होता. म्हणजेच, फक्त एकाच दिवसात सोने तब्बल 1 हजार रुपयांनी वाढले आहे. युद्धाच्या परिस्थितीत सोन्या-चांदीचे भाव सारखे बदलत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. दुसरीकडे चांदीच्या दरामध्ये देखील वाढ झाली असून, चांदी प्रति किलो 67 हजार 200 रुपयांवर पोहोचली आहे.

Advertisement

गुडरिटर्न्स वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 47700 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम 52040 इतके आहेत. पुण्यात 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा 47780 इतकी आहे, तर 24 कॅरट सोन्याची किंमत 50140 रुपये इतकी आहे. तर नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 47800 इतकी आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 50,140 इतकी आहे. चांदीच्या दरामध्ये देखील 672 रुपयांची वाढ होऊन, चांदीचे दर प्रति किलो 67 हजार 200 रुपयांवर पोहोचले आहेत.

Loading...
Advertisement

दरम्यान, रशियाने युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारले आहे. रशिया-युक्रेन संकटाचा थेट परिणाम जागतिक बाजारासह देशांतर्गत सराफा बाजारावर दिसून येत आहे. वाढती महागाई, कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ आणि भू-राजकीय तणाव या कारणांमुळे देशांतर्गत सोने मार्केटमध्ये सोन्याच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Advertisement

केडिया अॅडव्हायजरीचे संचालक अजय केडिया सांगतात की, सध्याच्या परिस्थितीमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा स्थितीत सुरक्षित गुंतवणुकीच्या दृष्टीने सोन्याकडे कल वाढेल, ज्यामुळे देशांतर्गत बाजारात सोने या वर्षाच्या अखेरीस 58000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे पोहोचण्याची शक्यता आहे. परिस्थिती आणखी बिघडल्यास किंमती 60 हजार रुपयांच्या पुढे जाऊ शकतात.

Advertisement

सोने आता नवीन रेकॉर्ड करण्याच्या तयारीत; पहा, आज सोन्याचे भाव वाढले की घटले..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply