Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

वाव.. ‘या’ चारचाकी कंपनीने विदेशात केलीय कमाल; पहा, एकाच महिन्यात काय केलेय रेकॉर्ड ?

दिल्ली : देश-विदेशातील प्रसिद्ध मारुती सुझुकीने कंपनीने नवा विक्रम केला आहे. मारुती सुझुकीने या वर्षी फेब्रुवारीमध्ये आतापर्यंत सर्वाधिक वाहनांची परदेशात निर्यात (Export) केली आहे. म्हणजेच कोणत्याही एका महिन्यात सर्वाधिक वाहनांची निर्यात झाली आहे. मारुती सुझुकीने फेब्रुवारी 2022 मध्ये 24,021 वाहनांची निर्यात केली आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये कंपनीने 11,486 वाहनांची निर्यात केली होती. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते फेब्रुवारीपर्यंत एकूण 2,11,880 वाहनांची निर्यात केली आहे. त्याच वेळी, मागील आर्थिक वर्षात याच कालावधीत, कंपनीची एकूण निर्यात विक्री 84,542 वाहने होती.

Advertisement

या वर्षात फेब्रुवारीमध्ये मारुती सुझुकीची एकूण विक्री 1,64,056 युनिट्स होती. त्याच वेळी, गेल्या वर्षात फेब्रुवारीमध्ये एकूण विक्री 164,469 युनिट्स होती. मारुतीने फेब्रुवारी 2022 मध्ये इतर कंपन्यांना सुद्धा 2,428 वाहनांची विक्री केली आहे. कंपनीने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये 5,500 वाहने अशा पद्धतीने विक्री केली होती. फेब्रुवारी 2022 मध्ये कंपनीने या सेगमेंटमध्ये 3,659 वाहनांची विक्री केली. तर गेल्या वर्षात फेब्रुवारीमध्ये कंपनीने 2,722 वाहनांची विक्री केली होती.

Advertisement

मात्र, या वर्षी फेब्रुवारीमध्ये देशांतर्गत बाजारात मारुती सुझुकीची कामगिरी कमकुवत राहिली आहे. कंपनीने फेब्रुवारी 2022 मध्ये देशांतर्गत बाजारात 1,37,607 वाहने विकली आहेत. तर गेल्या वर्षात फेब्रुवारीमध्ये कंपनीने देशांतर्गत बाजारात 1,47,383 वाहनांची विक्री केली होती. मारुतीने या वर्षात फेब्रुवारीमध्ये मिनी सेगमेंटमध्ये 19,691 वाहनांची विक्री केली आहे.

Loading...
Advertisement

तर गेल्या वर्षात फेब्रुवारीमध्ये कंपनीने या विभागात 23,959 वाहनांची विक्री केली होती. कॉम्पॅक्ट सेगमेंटमध्येही या वर्षी फेब्रुवारीमध्ये कंपनीला मोठा धक्का बसला. कंपनीने फेब्रुवारी 2022 मध्ये कॉम्पॅक्ट सेगमेंटमध्ये 77,795 वाहने विकली आहेत. तर गेल्या वर्षात फेब्रुवारीमध्ये कंपनीने या सेगमेंटमध्ये 80,517 वाहनांची विक्री केली होती.

Advertisement

आली रे आली.. आता हिरोची दमदार इलेक्ट्रिक स्कूटर आली; पहा, कोणत्या स्कूटरने घेतलीय एन्ट्री..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply