Jio Recharge Plans : ‘हे’ आहेत वर्षभर चालणारे प्लान; पहा, एकावेळी किती होतात पैसे खर्च..?
मुंबई : टेलिकॉम क्षेत्रात सध्या रिलायन्स जिओ कंपनी आघाडीवर आहे. या कंपनीचे रिचार्ज प्लान अन्य कंपन्यांच्या तुलनेत जास्त फायदेशीर ठरतात. त्यामुळे लोक या कंपनीला जास्त प्राधान्य देत आहेत. तर दुसरीकडे स्पर्धेत आघाडीवर राहण्यासाठी कंपनी सातत्याने नवीन प्लान लाँच करत असते. यामध्ये असेही काही प्लान आहेत, की एकदा रिचार्ज केले तर वर्षभर पुन्हा रिचार्ज करण्याची गरज राहत नाही.
त्यामुळे आज आम्ही तुम्हाला जिओच्या त्या उत्तम रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्हाला सारखे रिचार्ज करण्याचे टेन्शन राहणार नाही. जिओच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित कॉल आणि इंटरनेटसह OTT प्लॅटफॉर्मचेही फायदे मिळतील. या प्लानची किंमत मात्र थोडी जास्त आहे.
जिओच्या या रिचार्ज प्लॅनची किंमत 3119 रुपये आहे. या प्लॅनची एकूण वैधता 365 दिवस आहे. यामध्ये तुम्हाला इंटरनेट वापरासाठी दररोज 2GB डेटा मिळेल. या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलसह दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळत आहे. याशिवाय प्लॅनमध्ये तुम्हाला डिस्ने प्लस हॉटस्टार सबस्क्रिप्शन मिळत आहे. प्लॅनमध्ये तुम्हाला Jio Cinema, Jio TV, Jio Security आणि Jio Cloud चे सबस्क्रिप्शन देखील मिळते.
4199 रुपयांचा प्लान
जिओच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 365 दिवसांची वैधता मिळेल. या प्लॅनमध्ये तुम्हाला इंटरनेट वापरासाठी दररोज 3GB डेटा मिळत आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलसोबत दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधाही मिळत आहे. हा प्लान रिचार्ज केल्यानंतर, Disney Plus Hotstar चे सबस्क्रिप्शन देखील मिळेल. याशिवाय Jio चे इतर अॅप जसे की Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud मध्ये देखील सबस्क्रिप्शन मिळेल.
Jio Prepaid Plan: ‘हे’ आहेत 1 GB डेटाचे रिचार्ज प्लान.. पहा, आणखी काय मिळतात फायदे..?