मुंबई : देशातील आघाडीची इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी Hero Electric ने ‘Hero Eddy’ ही इलेक्ट्रिक स्कूटर देशातील मार्केटमध्ये लाँच केली आहे. या स्कूटरची सुरुवातीची किंमत 72,000 रुपये ठेवण्यात आली आहे. या स्कूटरचे खास वैशिष्ट्य म्हणजे यात कमी किमतीत अनेक दमदार फीचर्स मिळतील. ही इलेक्ट्रिक स्कूटर अनेक महत्वाच्या कामांसाठी तुम्हाला वापरता येईल.
या स्कूटरमध्ये ई-लॉक, रिव्हर्स मोड, आणि हेडलॅम्प यांसारखी वैशिष्ट्ये मिळतील. ही इलेक्ट्रिक स्कूटर दोन रंगात उपलब्ध करुन देण्यात आली आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नवीन मुंजाल म्हणाले, की आम्ही स्कूटर लाँच केली आहे यामध्ये अनेक स्मार्ट फीचर्स आहेत. या स्कूटरमुळे कोणतेही प्रदूषण होण्याचा प्रश्न नाही. कंपनी चार्जिंग सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दिशेनेही प्रयत्न करत आहे.
हिरोने चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडबरोबर भागीदारी केली आहे. यामुळे दुचाकी चार्जिंगसाठी पायाभूत सुविधा निर्माण होण्यास मदत होईल. हिरोचे मुख्य प्रतिस्पर्धी बजाज ऑटो आणि टीव्हीएस मोटर्स असतील आणि या कंपन्या इलेक्ट्रिक मार्केटमध्ये दाखल झाल्या आहेत, तर होंडा आणि सुझुकी अजूनही या मार्केटपासून दूर आहेत.
देशातील इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये प्रवेश करणार्या हिरोला पुढे जाण्याचा मार्ग नक्कीच सोपा नसेल कारण मार्केटमध्ये आधीपासूनच ओलो इलेक्ट्रिक, सिंपल वन, ओकिनावा आणि कोमाकी सारखे ब्रँड आहेत, जे अनेक इलेक्ट्रिक स्कूटर पर्याय देतात. ओला कंपनीकडे सध्या दोन इलेक्ट्रिक स्कूटर आहेत, जे ओला एस1 आणि ओला एस1 प्रो आहेत. दुसरीकडे, सिंपल आणि एथर सारख्या इलेक्ट्रिक स्कूटर आहेत. सिंपल वन येथे उत्तम ड्रायव्हिंग रेंज ऑफर करण्यात मदत करते, तर एथरला रिव्हर्स गियर सारखी आधुनिक वैशिष्ट्ये मिळतात. या स्कूटर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून बुक करता येतात.
‘या’ आहेत देशातील दमदार इलेक्ट्रिक स्कूटर; पहा, कोणती स्कूटर ठरेल तुमच्यासाठी बेस्ट..?