कमी गुंतवणुकीत सुरू करता येईल ‘हा’ बिजनेस; सरकार सुद्धा करील मदत; पहा, किती मिळेल उत्पन्न..?
अहमदनगर : सध्या जगात तसेच देशात आर्थिक अनिश्चिततेचे वातावरण आहे. रोजगार आणि उत्पन्नातील अस्थिरतेच्या काळात लोक उत्पन्नाचे नवीन पर्याय शोधत असतात. लोक त्यांच्या व्यवसायासाठी नवीन कल्पना वापरत आहेत. आज आम्ही अशाच एका बिजनेसबद्दल सांगत आहोत, जो तुम्ही तुमच्या घरातून सुरू करू शकता. आज आपण नाश्त्यासाठी पोहे बनवण्याच्या बिजनेसबद्दल माहिती घेणार आहोत. कोरोनानंतर लोक आरोग्याबाबतही जागरूक झाले आहेत. पोहे हे पौष्टिक अन्न मानले जाते. पोहे बहुतांशी नाश्त्यासाठी वापरले जातात. हे बनवायला देखील खूप सोपे असतात.
त्यामुळेच पोह्यांची बाजारपेठ वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही पोहा मॅन्युफॅक्चरिंग युनिट स्थापन करून तुमचा बिजनेस सुरू करू शकता. माफक गुंतवणुकीने सुरुवात करता येते. हा असा बिजनेस आहे. आम्ही तुम्हाला पोहे बनवण्याच्या युनिटबद्दल सांगत आहोत. हा एक चांगला बिजनेस आहे. पोह्यांना नेहमीच मागणी असते. त्यामुळे तुम्ही तयार केलेले पोहे पडून राहतील, असा विचार करण्याची काहीच गरज नाही.
तुम्हाला फक्त मार्केटचा शोध घ्यावा लागेल. हे देखील फार अवघड काम नाही. तुम्ही तुमच्या जवळील किराणा दुकान, शॉपिंग मॉल येथूनही सुरुवात करू शकता. या दुकानांना भेटी देऊन तेथून पोह्यांसाठी ऑर्डर मिळवता येतील. यानंतर हळूहळू तुम्हाला जसजशी मार्केटबद्दल माहिती होत जाईल तसा तुमचा बिजनेस आपोआप वाढत जाईल.
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या प्रकल्प अहवालानुसार, एका पोहा उत्पादन युनिटची किंमत सुमारे 2.43 लाख रुपये आहे. यामध्ये तुम्हाला 90 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळेल. अशा परिस्थितीत पोहा मॅन्युफॅक्चरिंग युनिटचा बिजनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला सुमारे 25,000 रुपयांची व्यवस्था करावी लागेल. हा बिजनेस सुरू करण्यासाठी सुमारे 500 चौरस फूट जागा आवश्यक आहे.
पोहे मशीन, भट्टी, पॅकिंग मशीन आणि ड्रमसह लहान वस्तू आवश्यक असतील. KVIC अहवालात असे सांगण्यात आले आहे की, या व्यवसायाच्या सुरुवातीला काही कच्चा माल घ्यावा लागेल, नंतर हळूहळू त्याचे प्रमाण वाढ करता येईल. त्यामुळे अनुभवही चांगला येईल, तसेच बिजनेस वाढीसही मदत होईल.
BUDGET 2022 : बिजनेसमन व नोकरदारांना मिळणार ‘असा’ही दिलासा..? पहा नेमके काय असेल बजेट पेटीत