रशिया-युक्रेन युद्धाचा इफेक्ट..! वाहन कंपन्यांनी रशियाला दिला जोरदार झटका; नुकसान टाळण्यासाठी घेतला ‘हा’ निर्णय
दिल्ली : युक्रेन आणि रशिया (Ukraine-Russia War) यांच्यात धोकादायक युद्ध सुरू आहे. ज्याचा परिणाम वाहन उद्योगावरही होत आहे. अनेक देशांनी रशियाविरुद्ध कठोर कारवाई करण्याची योजना आखली आहे. याबरोबरच अनेक मोठमोठ्या वाहन कंपन्याही रशियातील आपला व्यवसाय बंद करत आहेत. हे प्रथम अमेरिकन ऑटो ब्रँड आणि स्वीडिश कार निर्माते GM (जनरल मोटर्स) आणि व्होल्वो यांनी सुरू केले होते. ज्याने तात्पुरत्या स्वरुपात रशियातील आपला व्यवसाय बंद करण्याची घोषणा केली.
जीएमने एका निवेदनात म्हटले आहे, की ते देशातील वाहन निर्यात निलंबित करत आहेत. “यावेळी आमचे विचार युक्रेनच्या लोकांबरोबर आहेत,” असे निवेदनात म्हटले आहे. जीवितहानी ही एक शोकांतिका आहे आणि या भागातील लोकांची सुरक्षा ही आमची सर्वात मोठी काळजी आहे.’ GM रशियामध्ये दरवर्षी सुमारे 3,000 कार विक्री करते.
व्होल्वोने रशियाला होणारी कार शिपमेंट सध्या थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. व्होल्वो देशात दरवर्षी सुमारे 9,000 कारची विक्री करते. एबी व्होल्वोने रशियामध्ये ट्रकचे उत्पादनही स्थगित केले आहे. डेमलर ट्रकने रशियामधील व्यावसायिक घडामोडी बंद केल्या आहेत आणि रशियन ट्रक निर्मात्या कंपनी बरोबरील सहकार्याबाबत फेरविचार सुरू आहे.
मर्सिडीज-बेंज समूह लवकरात लवकर कामजमधील 15% स्टेक विकण्याच्या कायदेशीर पर्यायावर विचार करत आहे. आणखी जर्मन वाहन कंपनीने रशियामधील पुरवठादारांना आपल्या कारचा पुरवठा तात्पुरता थांबवला आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, “युरोपियन युनियन आणि अमेरिकेने टाकलेल्या निर्बंधांचे परिणाम स्पष्ट केल्यावर वितरण पुन्हा सुरू होईल.” युक्रेनकडून काही स्पेअर पार्ट मिळण्यास उशीर होत आहे. ज्यामुळे दोन जर्मन कारचे उत्पादन तात्पुरते थांबवणे भाग पाडले आहे. फोर्डने अद्याप याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही, परंतु ते आपल्या कर्मचार्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेत आहे.
आता रशिया विरोधात आर्थिक युद्ध जोरात..! पहा, ‘त्या’ गुंतवणूकदारांनी कोणती मोठी घोषणा केलीय..?