Take a fresh look at your lifestyle.

युद्धामुळे बिघडलेय खाद्यतेलांचे गणित..! पाम तेलामुळे वाढणार सर्व तेलांचे भाव; वाचा महत्वाची माहिती..

मुंबई : रशिया आणि युक्रेन (Russia-Ukraine War) यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचे दुष्परिणाम आता जाणवू लागले आहेत. युद्धाचा फटका आता देशातील सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा बसत आहे. या युद्धामुळे देशातील खाद्यतेलाचे गणित बिघडले आहे. सूर्यफूल तेलाचे सर्वात मोठे उत्पादक असलेल्या रशिया आणि युक्रेनमधून त्याची निर्यात जवळजवळ थांबली आहे. ज्यामुळे पाम तेलाची (Palm oil) मागणी प्रचंड वाढली आहे.

Advertisement

केडिया अॅडव्हायझरीचे कमोडिटी एक्सपर्ट आणि डायरेक्टर अजय केडिया सांगतात की, जागतिक बाजाराच्या दबावाखाली भारतात पहिल्यांदाच पाम ऑइल सर्व खाद्यतेलांपैकी सर्वात खर्चिक झाले आहे. याही पुढे, पाम तेलासह सर्व खाद्यतेलांचे दर 15-20 टक्के वाढू शकतात. रशिया आणि युक्रेन जगातील एकूण सूर्यफूल तेलाच्या सुमारे 70 टक्के निर्यात करतात आणि ही कमतरता आता पाम तेलाच्या माध्यमातून पूर्ण केली जात आहे.

Advertisement

केडिया म्हणाले की, पाम तेलाचा सर्वात मोठा उत्पादक असलेल्या मलेशियामध्ये मे 2020 मध्ये त्याची किंमत 1,937 रिंगित (मलेशियन चलन) होती, जी आता वाढून 7,100 रिंगित झाली आहे. म्हणजेच दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत पाम तेलाच्या किंमती तिपटीने वाढल्या आहेत. ही आतापर्यंतची सर्वाधिक किंमत आहे. मंगळवारीच पाम तेलाच्या फ्युचर्स किमतीने 7 टक्क्यांची उसळी घेतली होती.

Advertisement

पाम तेलाच्या वाढत्या किमती टाळण्यासाठी भारताने याआधी आपली रणनिती बदलली होती आणि खाद्यतेलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अधिकाधिक सूर्यफूल आणि सोयाबीन तेल आयात करण्याचे धोरण आखले होते. भारत सध्या युक्रेनमधून 17 लाख टन सूर्यफूल तेल आयात करतो, तर रशियाकडून दोन लाख टन आयात करतो. दोन्ही देशांतील निर्यात बंद झाल्यामुळे विक्रमी चालत असलेले पामतेल पुन्हा खरेदी करावे लागणार आहे.

Advertisement

पाम तेल सर्व प्रकारच्या शुद्ध तेलामध्ये वापरले जाते. शेंगदाणा तेल असो वा सोयाबीन तेल, त्यात पाम तेल मिसळलेले असते. याआधी मोहरीच्या तेलातही भेसळ केली जात होती, मात्र दोन वर्षांपूर्वी सरकारने त्यावर बंदी घातली. म्हणजेच पामतेलाच्या किमतीत वाढ झाल्याने मोहरी वगळता सर्व प्रकारचे खाद्यतेलाचे दर वाढण्याची शक्यता आहे. ज्याची किंमत आधीच 15 रुपयांनी वाढली आहे.

Advertisement

तिकडे होतंय युद्ध पण, बिघडणार तुमच्या घरखर्चाचे बजेट; पहा, खाद्यतेल कसा देणार झटका..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply