Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आता रशिया विरोधात आर्थिक युद्ध जोरात..! पहा, ‘त्या’ गुंतवणूकदारांनी कोणती मोठी घोषणा केलीय..?

दिल्ली : युक्रेनमध्ये रशियन सैन्याचे सलग सहाव्या दिवशीही हमले सुरुच आहेत, तर पाश्चात्य देशांनी आर्थिक आघाडीवर रशियाविरुद्ध सुरू केलेले युद्ध अधिक तीव्र केले आहे. मॅन ग्रुप आणि ब्रिटिश कंपनी एबर्डीन यांनी मंगळवारी सांगितले, की ते रशियामधील त्यांची गुंतवणूक कमी करतील. व्हिसा (Visa) आणि मास्टरकार्डने (Mastercard) अनेक रशियन वित्तीय संस्थांना त्यांच्या नेटवर्कमधून अवरोधित केले.

Advertisement

एबर्डीनने रशियामध्ये सुमारे 200 कोटी पौंड गुंतवणूक केली आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, स्टीफन बर्ड यांनी नजीकच्या भविष्यात रशिया आणि बेलारूसमध्ये गुंतवणूक करणार नाही, असे सांगितले. रशियावरील निर्बंधांचा प्रभाव युरोपियन बँकांवर दिसून आला, त्यांचे समभाग 10 ते 20% ने घसरले आहेत. रिफसेन बँकेचे शेअर्स सोमवारी 14 टक्के आणि मंगळवारी 5 टक्के घसरले. इटलीच्या युनिक्रेडिटमध्येही 10% घट झाली. विविध स्टॉक एक्स्चेंजमध्ये दोन दिवसांत बँकिंग प्रणालीत 7 टक्के घट झाल्याचे दिसून आले.

Advertisement

रशियामध्ये मंगळवारी स्टॉक ट्रेडिंग बंद राहिले. सोमवारी शेअर बाजारही बंद होता. इंस्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल फायनान्सने रशियाच्या अर्थव्यवस्थेत 10% पेक्षा जास्त घसरण दर्शविली आहे. डॉलरच्या तुलनेत 82 ते 120 पर्यंत घसरल्यानंतर मंगळवारी रशियन चलन रूबल 3.3 टक्के वाढले. मॉस्कोमध्ये त्याची किंमत 91.49 आणि इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म EBS वर 103 इतकी होती.

Loading...
Advertisement

चीनच्या दबावाला बळी पडलेल्या तैवाननेही स्विफ्ट प्रणालीवरून रशियावर बंदी घालण्याची घोषणा केली. देशाच्या बँकांकडून रशियन बँकांमध्ये कोणतेही व्यवहार होणार नाहीत. हे उल्लेखनीय आहे की चीनने आतापर्यंत रशिया-युक्रेन युद्धात रशियाचे खुलेपणाने समर्थन करून निर्बंधांना विरोध केला आहे.

Advertisement

30 सदस्य राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने टोकियो येथे एक विशेष बैठक आयोजित केली. जिथे तेलावरील युद्धाचा प्रभाव कमी करण्याच्या उपायांवर चर्चा केली जाईल. युद्धग्रस्त युक्रेनमध्ये सध्या 4.70 लाख परदेशी नागरिक अडकले आहेत. त्यामध्ये विद्यार्थी आणि इतर कामगार वर्ग मोठ्या संख्येने स्थलांतरित कामगारांचा समावेश आहे. संयुक्त राष्ट्रांच्या स्थलांतर संस्थेने (IOM) मंगळवारी ही माहिती दिली. त्यांनी युक्रेनच्या सर्व शेजारी देशांना या लोकांना आश्रय देण्याचे आवाहन केले.

Advertisement

Russia-Ukraine War : आता भारताने रशियाला ‘तसे’ स्पष्ट सांगण्याची वेळ आलीय; पहा, काँग्रेसने सरकारकडे काय केलीय मागणी ?

Advertisement
Advertisement

Leave a Reply