Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

सोने आता नवीन रेकॉर्ड करण्याच्या तयारीत; पहा, आज सोन्याचे भाव वाढले की घटले..?

मुंबई : रशिया आणि युक्रेन युद्धाच्या संकटाच्या काळात सध्या सोने आणि चांदीचे भाव वेगाने वाढत चालले आहेत. त्यामुळे सोन्याने 50 हजारांचा टप्पा पार केला आहे. आता सोने 52 हजारांच्या जवळ आले आहे. आज आठवड्याच्या तिसऱ्या दिवशीही सकाळच्या सत्रात सोन्याच्या दरात वाढ नोंदवण्यात आली. आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचे भाव वाढल्याचे दिसून आले. आज एप्रिल डिलिव्हरी सोन्याचे दर 0.6 टक्क्यांनी वाढले. चांदीचे दर मात्र कमी झाले आहेत. आज चांदीचे दर 0.41 टक्क्यांनी कमी झाले.

Advertisement

एप्रिल डिलीव्हरी सोन्याचा दर आज 0.6 टक्क्यांच्या तेजीसह 51,845 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. आज चांदी स्वस्त झाली आहे. आज 1 किलो चांदीचा भाव 0.41 टक्क्यांच्या घसरणीसह 67,900 रुपयांवर पोहोचला आहे.

Advertisement

दरम्यान, रशियाने युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारले आहे. रशिया-युक्रेन संकटाचा थेट परिणाम जागतिक बाजारासह देशांतर्गत सराफा बाजारावर दिसून येत आहे. वाढती महागाई, कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ आणि भू-राजकीय तणाव या कारणांमुळे देशांतर्गत सोने मार्केटमध्ये सोन्याच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Loading...
Advertisement

केडिया अॅडव्हायजरीचे संचालक अजय केडिया सांगतात की, सध्याच्या परिस्थितीमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा स्थितीत सुरक्षित गुंतवणुकीच्या दृष्टीने सोन्याकडे कल वाढेल, ज्यामुळे देशांतर्गत बाजारात सोने या वर्षाच्या अखेरीस 58000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे पोहोचण्याची शक्यता आहे. परिस्थिती आणखी बिघडल्यास किंमती 60 हजार रुपयांच्या पुढे जाऊ शकतात.

Advertisement

रशिया आणि युक्रेनमधील संकटामुळे गुंतवणूकदार घाबरले आहेत. जगभरातील शेअर बाजारातील प्रचंड अस्थिरता आणि अन्य कारणे पाहता ते सोन्याकडे वळतील. त्यामुळे नजीकच्या भविष्यात सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता जास्त आहे. अशा परिस्थितीत 31 मार्च 2022 पर्यंत देशांतर्गत बाजारात सोने 53,500 रुपये प्रति 10 ग्रॅमचा टप्पा गाठू शकते.

Advertisement

Gold Price : सोन्याची भाववाढ सुरुच; पहा, आज पहिल्याच दिवशी किती रुपयांनी वाढले सोने..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply