Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

तीन कंपन्यांचे महिनाभर चालणारे प्लान.. एक दिवसाचा खर्च फक्त 4.7 रुपये.. पहा, किती मिळतोय डेटा..

मुंबई : रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया (Vi) ने काही महिन्यांआधी त्यांच्या प्रीपेड प्लॅनच्या किमतीत 20-25% ने वाढ केली आहे. तथापि, या कंपन्यांनी काही पॉकेट फ्रेंडली प्रीपेड योजना देखील सादर केल्या आहेत. तुम्‍हाला शॉर्ट टर्म प्लान नको असतील तर आणि महिनाभरासाठी प्लान हवे असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे कारण, आम्‍ही तुम्‍हाला Jio, Airtel आणि व्होडाफोन आयडीया या कंपन्यांच्या 84 दिवसांच्या प्‍लॅनबद्दल माहिती देणार आहोत.

Advertisement

जिओ 395 रुपयांच्या प्लॅनचे फायदे
या प्लॅनसह कंपनी वापरकर्त्यांना 84 दिवसांची वैधता देते. Jio प्रीपेड प्लॅन्सच्या पोर्टफोलिओमध्ये 84 दिवसांच्या वैधतेसह हा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. या प्लॅनचा एका दिवसाचा खर्च फक्त 4.7 रुपये आहे. प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 6 GB डेटा दिला जातो. तुम्ही हा डेटा 84 दिवसांमध्ये कधीही वापरू शकता. याशिवाय, सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉल आणि एकूण 1000 एसएमएस देखील 84 दिवसांसाठी दिले जातात. या प्लॅनमध्ये केवळ डेटाशिवाय, मोफत कॉल आणि एसएमएस, जिओ सिनेमा, जिओ टीव्ही, जिओ सिक्युरिटी आणि जिओ क्लाउडचेही मोफत सबस्क्रिप्शन मिळते.

Advertisement

व्होडाफोन आयडिया 459 रुपयांच्या प्लानचे फायदे
Vodafone-Idea चा 459 रुपयांचा प्लान 6 GB डेटा मर्यादेसह येतो. तुम्हाला वाटल्यास तुम्ही एकाच दिवसात 6 GB डेटा वापरू शकता किंवा 84 दिवस चालवू शकतात. तसेच, अमर्यादित कॉल सुविधा 84 दिवसांसाठी उपलब्ध आहे. याशिवाय 1000 एसएमएस उपलब्ध आहेत. Vi Movies & TV फोनची मोफत सदस्यता देखील उपलब्ध आहे.

Loading...
Advertisement

एअरटेलचा 455 रुपयांचा प्लान
एअरटेलच्या 455 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 6 जीबी डेटा मिळतो. हा प्लान 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. याबरोबरच अनलिमिटेड कॉल आणि 900 एसएमएसची सुविधाही उपलब्ध आहे. हा प्लॅन प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशन, फ्री हॅलो ट्यून्स, विंक म्युझिक फ्री सह येतो.

Advertisement

Jio Prepaid Plan: ‘हे’ आहेत 1 GB डेटाचे रिचार्ज प्लान.. पहा, आणखी काय मिळतात फायदे..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply