Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Russia-Ukrain crisis: फक्त रशियालाच नाही जगालाही फटका; पहा निर्बंधांमुळे नेमके काय होईल ते

दिल्ली : युक्रेनवर (Russia-Ukrain war) हल्ला करणाऱ्या रशियावर अमेरिकेने कठोर निर्बंध जाहीर केले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन (Joe Biden) यांनी बुधवारी सांगितले की, त्यांचा देश आपल्या मित्र राष्ट्रांसह रशियावर कठोर निर्बंध लादत आहे. या निर्बंधांचा रशियाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो. रिपोर्ट्सनुसार, देशात एटीएमबाहेर लोकांच्या रांगा लागल्या आहेत. रूबलच्या किमतीत मोठी घसरण होण्याची भीती लोकांना वाटत आहे. देशातील गुंतवणूक झपाट्याने कमी होत आहे. ब्रिटिश पेट्रोलियम आणि शेलसह अनेक परदेशी फंडांनी रशियन मालमत्ता गोठवण्याची घोषणा केली आहे.

Advertisement

जागतिक अर्थव्यवस्थेवरही निर्बंधांचा परिणाम होऊ शकतो आणि पुरवठा साखळी प्रभावित झाल्यामुळे महागाई वाढू शकते. कोविड-19 महामारीच्या प्रभावातून जागतिक अर्थव्यवस्था सावरत होती, परंतु आता त्याचा वेग मंदावू शकतो. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीने आधीच अनेक वर्षांच्या उच्चांकावर पोहोचले आहे. त्यात आणखी वाढ झाल्यास जगभरातील महागाई वाढू शकते. याआधीच अनेक वस्तूंच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. काही तज्ञांचे म्हणणे आहे की युक्रेन-रशिया संकटामुळे यावर्षी जागतिक जीडीपीमध्ये 0.2 टक्के घट होऊ शकते.

Loading...
Advertisement

ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सच्या मते, रशिया आणि युक्रेनमधील अस्थिरतेचा जागतिक अर्थव्यवस्थेवर मर्यादित परिणाम होईल. कारण त्यांची अर्थव्यवस्था आणि आर्थिक बाजारपेठ फार मोठी नाही. जगातील एकूण निर्यातीत रशियाचा वाटा दोन टक्क्यांहून कमी आहे. त्याचप्रमाणे जागतिक शेअर बाजार भांडवलात रशियाचा वाटा एक टक्क्यांहून कमी आहे. युक्रेनचा वाटा 0.01-0.3 टक्के आहे. रशियामधील BIS बँकांची गुंतवणूक $90 अब्ज आहे. यातील बहुतांश गुंतवणूक युरोपियन बँकांची आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply