Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Goat Farming Info : कळपातील बेणूचा बोकड असा निवडा; वाचा खास माहिती व ट्रिक्स

वास्तवाचे भान आणि जगभराचे ज्ञान देण्याच्या हेतून ‘टीम कृषीरंग’तर्फे शेळीपालन (Goat Farming Marathi Information) ही लेखमाला प्रसिद्ध केली जात आहे. आज आपण पाहणार आहोत कळपातील बेणूचा बोकड (Male Goat care) या महत्वाच्या विषयावरील माहिती. एकूण शेळीपालन व्यवसायाचा कणा म्हणजे हा बेणूचा बोकड म्हणायला हवा. कारण, योग्य जातीच्या शेळ्या आणून त्यांच्याद्वारे दर्जेदार करडे पैदास घेण्यसाठी बोकड हा घटक खूप महत्वाचा असतो. एकूण कळपातील नफ्यामध्ये त्याचा वाटा ५० टक्के असतो असे म्हणण्यालाही वाव आहे. (Shelipalan Mahiti)

Advertisement

आपल्याकडे स्थानिक जातीच्या चांगल्या निवडलेल्या शेळ्या असतील तर त्यांना बेस्ट बोकडही लागण करण्यासाठी असावाच लागतो. शेळ्यांच्या कळपाचे भविष्य त्यावरच अवलंबून असते. त्यामुळे बोकड निवडताना जास्तीतजास्त २० शेळ्यांसाठी एक बोकड असेच गुणोत्तर ठेवावे. यापेक्षाही कमी गुणोत्तर असेल तर उत्तम. गोट फार्मिंगचे ‘जावई’ हे सूत्र आपण अभ्यासले आहे. त्याचाच आधार घेऊन जातिवंत बोकड निवडावा. बोकडाचे वय दीड ते पाच वर्षे यादरम्यान असावे. तसेच इतर महत्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे :

Advertisement
  • बेणूच्या बोकडाचे वजन इतर शेळ्यांच्या तुलनेत जास्त असावे.
  • हा बोकड आपल्या गोठ्याचे भविष्य ठरवणार असल्याने त्यासाठीचा जास्तीचा खर्च लक्षात घेऊनच नीयोजन करावे.
  • निवडलेला बेणूचा बोकड हा चपळ आणि तडफदार असावा. दिसायला रुबाबदार असल्यास चांगले.
  • बोकडाची छाती रुंद आणि मानेवर व खांद्यावर झुपकेदार आयाळ असावी.
  • वीर्याची गुणवत्ता उत्तम आणि नर असल्याचे गुण त्यामध्ये ठळक दिसत असल्याकडे लक्ष द्यावे.
  • अंडाशय मापात असावे. जास्त लोंबणारे किंवा खूप आखूड असे दोन्हीही त्यात नसेल याची काळजी घ्यावी.
  • अंडाशयातील दोन्ही बाजूच्या गोट्या (वृषणे) समान आणि उत्तम असल्याची दक्षता घ्यावी.
  • अशा पद्धतीने नराची निवड करताना शक्यतो जुळे किंवा तिळे झालेले असताना त्यातील एका सर्वात पहिल्या किंवा सदृढ असलेल्या करडाची बेणूचा बोकड म्हणून निवड करावी.
  • क्रॉसब्रीड करण्याचे नियोजन असल्यास आपल्याला कोणत्या जातीच्या शेळ्या हव्या आहेत त्यानुसार त्या जातीचाच बोकड आणावा.
  • बोकडाची निवड करताना असा बेणूचा बोकड संबंधित शेळ्यांच्या जातीचे जास्तीतजास्त गुणधर्म दाखवणारा असावा.

एकूण सर्वात महत्वाचा आणि वाचकांना आठवण करून देणारा मुद्दा म्हणजे असा बेणूचा बोकड डर दोन वर्षांनी बदलण्याची काळजी घ्यावी. तसेच स्थानिक मार्केट आणि आपली गरज यानुसार असा बेणूचा बोकड आणावा. एखादा रुबाबदार बोकड पाळण्याची आपणास खूप इच्छा असेल तर अशावेळी आपल्या कळपाचा बोकड वेगळा आणि आपली हौस म्हणून घेतलेला बोकड वेगळा असेल याचीही काळजी घ्यावी. शेळीपालन विषयाच्या या खास लेखमालेस जगभरात पसरलेल्या मराठी भाषिक वाचकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. वास्तवाचे भान देण्याच्या हेतून आम्ही ही लेखमाला प्रसिद्ध करीत आहोत. इमेलद्वारे मिळालेल्या आपल्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी स्वतंत्र लेख पुढील काही भागात प्रसिद्ध होतील. (क्रमशः)

Loading...
Advertisement

संपादन व लेखन : सचिन मोहन चोभे

Advertisement

वाचक बंधू-भगिनींनो, आपण ‘कृषीरंग’वर दररोज शेळीपालन (Goat Farming) या विषयावरील माहितीची मालिका प्रसिद्ध करणार आहोत. यामध्ये महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीसह जगभरातील गोट फार्मिंग ट्रेंड आणि संशोधन याबाबतची माहिती आपण घेणार आहोत. सध्या या व्यवसायाला ‘अच्छे दिन’ आल्याच्या बातम्या माध्यमांतून येतात. अशावेळी या व्यवसायाचे वास्तव आणि व्यावहारिक भान देण्याचा हा प्रयत्न आहे. आपणास कोणत्याही सूचना व मार्गदर्शन करावेसे वाटल्यास krushirang@gmail.com या इमेलद्वारे आपण आम्हाला संपर्क करू शकता. तसेच नियमित बातम्यांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय न्यूज अपडेट आणि कृषी-ग्रामीण विकासाची माहिती पाहण्यासाठी आमचे www.facebook.com/Krushirang (कृषीरंग) हे फेसबुक पेज लाईक व फॉलो करा. ही माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांना माहितीसाठी शेअर करा. @टीम कृषीरंग

Advertisement
Advertisement

Leave a Reply