Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Poultry Farming Info: त्यासाठी ‘दिशा’ आहे महत्वाची, नाहीतर बसू शकतो मोठा फटका

सध्या करोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत खेड्याकडे चला (Go To Village) हा नारा बुलंद झाला आहे. त्याचवेळी शहरात पैसे कमावले, मात्र आता पुन्हा तिकडे जाण्याची भीती वाटत असल्याने गावाकडे स्थिरस्थावर होण्याचा विचारही रुजत आहे. अशा नव्याने गाववाले होणाऱ्यांना शेतीमधील संधी खुणावत आहेत. शेळीपालन (Goat Farming), कुक्कुटपालन (Poultry Farming), प्रक्रिया व्यवसाय (Food Processing) किंवा इतर छोटेमोठे कृषी आधारित व्यवसाय (Agriculture base other business) याकडे अशा मंडळींचे विशेष लक्ष आहे. त्यातील पोल्ट्री व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांनी हा लेख वाचवा आणि आपल्या इतर इच्छुक मित्रांनाही हा शेअर करावा.

Advertisement

पोल्ट्रीमधील संधी आणि आव्हाने यांची माहिती आपण मागील ३ लेखमालेत घेतली आहे. आजपासून आपण रोज हा व्यवसाय करण्याची माहिती, तंत्रशुद्ध ट्रिक्स आणि व्यवस्थापनाचे नियम यांची माहिती घेणार आहोत. या पहिल्या लेखात आपण शेडची जागा आणि त्याची दिशा याबाबतचे मुद्दे पाहणार आहोत. कोणत्याही व्यवसायाची दिशा निश्चित (shed construction technique) करूनच व्यवसाय करण्याच्या फंदात पडावे. आपल्याला पोल्ट्री व्यवसाय झेपणार आहे का, आपण त्यातील कोंबड्यांना योग्य न्याय देऊ शकू का..? आदि प्रश्न आपल्याच मनाला विचारा आणि त्यातील आपली टक्केवारी ८० च्याही वर असेल तर किंवा आता दुसरा पर्याय नाही, हेच करायचे असे जेंव्हा मनात येईल तेंव्हा पोल्ट्री करण्याच्या फंदात पडा. प्रथम यासाठीच्या शेडची जागा निश्चित करा. आपल्याकडे उपलब्ध आहे ती जागा यासाठी वापरू नका. उपलब्ध असलेली किंवा इतर जागांवर जाऊन पाहणी करून किंवा असा व्यवसाय यशस्वीपणे करणाऱ्या मित्र व तज्ञांचा सल्ला घेऊन जागा निवडा.

Advertisement

जागा निवडताना लक्षात घेण्याचे मुद्दे :

Loading...
Advertisement
  • जास्त उंच नको, मात्र पाणी साचून न राहणारी सखल जागा निवडावी. अशी जमीन पाण्याचा योग्य निचरा होणारी असावी.
  • कुक्कुटपालन व्यवसायात खूप लक्षपूर्वक व्यवस्थापन करावे लागते. एक किरकोळ चूक मोठा तोटा पदरात टाकू शकते. त्यामुळेच शेडकडे जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता असावा. पिल्ले, खाद्य, औषधे, तूस, खत आणि कोंबड्या यांची वाहतूक करण्यासाठी येणाऱ्या मोठ्या गाड्या तिथे पोहोचतील असा रस्ता असावा.
  • आपल्याकडे स्थानिक भागात विक्री करायची असल्यास, किंवा शेड कंपनीला कराराने द्यायचे असल्यासही त्यानुसार नियोजन करून जागा निवडावी.
  • पोल्ट्रीसाठी वर्षभर पाणी लागते. खूप मुबलक नाही, मात्र गरजेपुरते स्वच्छ आणि शुद्ध पाणी यासाठी लागते. त्यासाठी पाण्याची उपलब्धता असण्याची काळजी घ्यावी.
  • पाणी चांगल्या दर्जाचे असल्याचे पाहावे. त्यासाठी असे पाणी मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत तपासणी करून घ्यावे.
  • पाण्यामध्ये क्षाराचे प्रमाण खूप जास्त असल्यास पाणी पिण्यायोग्य करणारी यंत्रसामुग्री बसवून घ्यावी.
  • एक हजार पक्षांसाठी ४०० लिटर यानुसार पाण्याचा हिशोब लक्षात घेऊन पाण्याचे नियोजन करावे.
  • शेडमध्ये ब्र्युडींग, पाणी, खाद्य व स्वच्छता आणि आता तर स्वयंचलित वातानुकूलित पोल्ट्री शेडसाठी इतर उपकरणे चालवण्यासाठी त्या जागेवर विजेची उपलब्धता असावी. तसेच पर्यायी साधन म्हणून तिथे विद्युत जनित्र बसवून घ्यावे.
  • शेडची दिशा पूर्व-पश्चिम अशी असावी. त्यामुळे उन्हाळ्यात गरम हवा आणि पावसाळ्यात पावसापासून संरक्षण होण्यास मदत होते.
  • जमिनीची आपल्याकडे उपलब्धता नसल्यास अशावेळी ती विकत घ्यावी. मात्र, त्यासाठी खूप काही पैसे देण्याची तयारी ठेऊ नये. कारण, शेतजमिनीच्या खरेदीत पैसे गेल्यावर मग शेड बांधण्यासाठी पैसे राहणार नाहीत. त्याचाच परिणाम म्हणून आपण शेड बांधकामात काही प्रमाणात कमी लक्ष देऊ शकतो आणि त्यातून कुक्कुटपालन व्यवस्थापनात अडचणी येऊ शकतात.

आजच्या भागात आपण प्राथमिक मुद्दे पहिले आहेत. याच्याच पुढच्या भागात आपण शेड बांधकामाची दिशा दाखवणारे काही मुद्दे पाहणार आहोत. (क्रमशः)

Advertisement

लेखक व संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

वाचक बंधू-भगिनींनो, आपण ‘कृषीरंग’वर दररोज कुक्कुटपालन अर्थात पोल्ट्री फार्मिंग (Poultry Farming) या विषयावरील माहितीची मालिका प्रसिद्ध करणार आहोत. यामध्ये महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीसह जगभरातील पोल्ट्री फार्मिंग ट्रेंड आणि संशोधन याबाबतची माहिती आपण घेणार आहोत. सध्या या व्यवसायाला ‘अच्छे दिन’ आल्याच्या बातम्या माध्यमांतून येतात. अशावेळी या व्यवसायाचे वास्तव आणि व्यावहारिक भान देण्याचा हा प्रयत्न आहे. आपणास कोणत्याही सूचना व मार्गदर्शन करावेसे वाटल्यास krushirang@gmail.com या इमेलद्वारे आपण आम्हाला संपर्क करू शकता. तसेच नियमित बातम्यांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय न्यूज अपडेट आणि कृषी-ग्रामीण विकासाची माहिती पाहण्यासाठी आमचे www.facebook.com/Krushirang (कृषीरंग) हे फेसबुक पेज लाईक व फॉलो करा. ही माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांना माहितीसाठी शेअर करा. @टीम कृषीरंग

Advertisement
Advertisement

Leave a Reply