Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

… तरीही येणार तेलाचा सुकाळ..! युद्धाचा धोका पाहता ‘ते’ 31 देश देणार ‘इतके’ तेल; जाणून घ्या, डिटेल..

दिल्ली : रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती भरमसाठ वाढल्या आहेत. आता तर क्रूड तेलाच्या किंमती 100 डॉलरच्याही पुढे गेल्या आहेत. या किंमती आणखी वाढण्याचीही शक्यता आता व्यक्त होत आहे. असे असले तरी या संकटकाळात तेलाची टंचाई निर्माण होणार नाही, याचीही काळजी घेण्यात येत आहे. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी (IEA) च्या सर्व 31 सदस्य राष्ट्रांनी त्यांच्या सामरिक साठ्यातून 6 कोटी बॅरल तेल सोडण्यास सहमती दर्शवली आहे. युक्रेनवर रशियाच्या हमल्यामुळे तेलाचा पुरवठा कमी होणार नाही, हे तेल बाजाराला सांगण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement

मंगळवारी या निर्णयाबाबत माहिती देताना संघटनेने सांगितले की, अमेरिकन ऊर्जा सचिव जेनिफर ग्रॅनहोम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऊर्जा मंत्र्यांच्या असाधारण बैठकीत संचालक मंडळाने हा निर्णय घेतला. यात अमेरिका व्यतिरिक्त जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, जपान आणि कॅनडा यांचाही समावेश आहे. IEA सदस्यांकडे 1.5 अब्ज बॅरल तेलाचा आपत्कालीन साठा आहे. जारी केलेले प्रमाण या साठ्याच्या चार टक्के किंवा 30 दिवसांपर्यंत दररोज सुमारे 20 लाख बॅरल आहे.

Loading...
Advertisement

IEA चे कार्यकारी संचालक म्हणाले, की “ऊर्जा बाजारातील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. जागतिक ऊर्जा सुरक्षा धोक्यात आहे, ही परिस्थिती जागतिक अर्थव्यवस्था अशा वेळी धोक्यात आणत आहे जेव्हा ती पुन्हा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. हा निर्णय अशा वेळी घेण्यात आला आहे जेव्हा मंगळवारी अमेरिकन मानक कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 100 डॉलरच्या पुढे गेली आहे. 2014 नंतर तेलाच्या किमतीची ही सर्वाधिक पातळी आहे.

Advertisement

पुढील महिन्यात येणार तेलाचा ‘सुकाळ’..! म्हणून ‘ते’ देश कच्च्या तेलाचे उत्पादनात करणार वाढ.. जाणून घ्या, काय होतील परिणाम ?

Advertisement
Advertisement

Leave a Reply