Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Honda आणि Hero ला जोरदार झटका..! मिळालीय ‘ही’ टेन्शन देणारी बातमी; पहा, फेब्रुवारी महिन्यात काय घडले..?

मुंबई : दुचाकी उत्पादक Honda मोटरसायकलची एकूण विक्री फेब्रुवारी 2022 मध्ये 29 टक्क्यांनी कमी होऊन 3,12,621 युनिट झाली. होंडा मोटरसायकलने एका निवेदनात म्हटले आहे, की त्यांनी फेब्रुवारी 2021 मध्ये एकूण 4,42,696 वाहनांची विक्री केली होती.

Advertisement

कंपनीची देशांतर्गत विक्रीही गेल्या महिन्यात 31 टक्क्यांनी घसरून 2,85,677 युनिट्सवर आली आहे, जी गेल्या वर्षात याच महिन्यात 4,11,622 युनिट्स होती. याच होंडा मोटारसायकलने फेब्रुवारी 2022 मध्ये 26,944 युनिट्सची निर्यात केली.

Advertisement

याशिवाय फेब्रुवारी 2022 मध्ये Hero MotoCorp ची विक्री 29 टक्क्यांनी घसरून 3,58,254 युनिट्सवर आली आहे. Hero MotoCorp ने सांगितले, की कंपनीने 2021 मध्ये याच महिन्यात 5,05,467 युनिट्सची विक्री केली होती. कंपनीची देशांतर्गत विक्रीही फेब्रुवारी 2022 मध्ये 31.57 टक्क्यांनी घसरून 3,31,462 युनिट्सवर आली आहे, जी फेब्रुवारी 2021 मध्ये 4,84,433 युनिट्स होती.

Loading...
Advertisement

याशिवाय Hero MotoCorp ने गेल्या महिन्यात 3,38,454 मोटारसायकलींची विक्री केली होती जी 2021 च्या याच महिन्यात 4,63,723 मोटारसायकली विकल्या गेल्या होत्या. फेब्रुवारी 2022 मध्ये कंपनीच्या स्कूटर विक्रीतही घट होऊन 19,800 युनिट्स झाली. एका वर्षाआधी याच महिन्यात कंपनीने 41,744 स्कूटर विकल्या होत्या. तथापि, कंपनीची निर्यात फेब्रुवारी 2021 मध्ये 21,034 युनिट्सवरून गेल्या महिन्यात 26,792 युनिट्सपर्यंत वाढली.

Advertisement

दरम्यान, आता या दोन्ही कंपन्या लवकरच इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार आहेत. कंपन्यांनी तयारीही सुरू केली आहे. मात्र, त्याआधीच दोन्ही कंपन्यांच्या टेन्शनमध्ये वाढ करणारी ही बातमी मिळाली आहे. फेब्रुवारी महिन्यात दोन्ही कंपन्यांच्या मोटारसायकलच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. सध्या जगभरात संकटांचा काळ आहे. त्याचा फटका या कंपन्यांना बसला असल्याचे आता सांगण्यात येत आहे.

Advertisement

इलेक्ट्रिक स्कूटर घेताय..? जरा थांबा..! आता लवकरच येणार हिरोची इलेक्ट्रिक स्कूटर; पहा, काय आहे कंपनीचे नियोजन..

Advertisement
Advertisement

Leave a Reply