बाब्बो.. रशिया-युक्रेन युद्धाचा ‘असा’ घातक इफेक्ट; ‘येथे’ पेट्रोल गेलेय 200 पार; पहा, कुठे उडालाय इंधनाचा भडका..?
दिल्ली : युक्रेन-रशिया युद्धामुळे (Russia-Ukraine War) कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने त्याचा परिणाम इंधनाच्या दरावर दिसू लागला आहे. भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सध्या स्थिर आहेत, पण शेजारच्या श्रीलंकेत (Srilanka) किमतीत कमालीची वाढ झाली आहे.
अलीकडेच, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या श्रीलंकेतील उपकंपनीने पेट्रोलच्या दरात 20 रुपयांनी आणि डिझेलच्या दरात 15 रुपयांची वाढ केली आहे. लंका इंडियन ऑइल कंपनी (LIOC) ने या महिन्यात दुसऱ्यांदा इंधनाच्या दरात वाढ केली आहे. आता श्रीलंकेत पेट्रोल तब्बल 204 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 139 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. लंका इंडियन ऑइल कंपनीने जागतिक पातळीवर इंधनाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.
भारतात मार्च महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल आणि डिझेलचे दर मागील 117 दिवसांपासून स्थिर आहेत. राजधानी दिल्लीत पेट्रोल 95.41 आणि डिझेल 86.67 प्रतिलिटर मिळत आहे. मुंबईत पेट्रोल 109.98 रुपये प्रति लिटर इतके आहे. देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये 82.96 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे, तर डिझेलही येथे 77.13 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. त्याचवेळी, राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोलसाठी सर्वात जास्त म्हणजे 112.11 रुपये द्यावे लागत आहेत.
दरम्यान, श्रीलंका सध्या गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. श्रीलंकेत महागाईचा भडका उडाला आहे. तर परकीय चलनाचा साठाही जवळपास रिकामा झाला आहे. या वाईट परिस्थितीत, श्रीलंका सरकारने 1.2 अब्ज डॉलर आर्थिक मदत पॅकेज जाहीर केले आहे. मात्र, श्रीलंकेवर हे संकट का आले याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर यासाठी चीन काही प्रमाणात जबाबदार असल्याचे मानले जात आहे. आता या देशाने या संकटातून बाहेर पडण्यासाठी आणि दिवाळखोरी होऊ नये, यासाठी सोन्याची विक्री सुरू केली आहे. असे करून हा देश आपल्या अर्थव्यवस्थेला आधार देण्याचा प्रयत्न करत आहे.
सोने विकून देखील आर्थिक संकट अद्याप मिटलेले नाही. त्यामुळे या देशाला भारताकडून आणखी मदत मिळण्याची अपेक्षा आहे. श्रीलंकेच्या सरकारने भारताकडून 1.5 अब्ज डॉलर मदत मिळण्याची अपेक्षा असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे, काही आठवड्यांआधी भारताने श्रीलंकेला एक अब्ज डॉलर्सचे मदत पॅकेज आणि पेमेंट बॅलन्स सपोर्टची घोषणा केली होती.
चीनच्या कृपेने श्रीलंका बेहाल..! पहा काय वाईट स्थिती झालीय शेजारी देशाची