देशातील श्रीमंत लोकांची संख्या वाढली..! पहा, अब्जाधीशांच्या बाबतीत जगात कोणता देश आहे नंबर वन..?
दिल्ली : गेल्या वर्षात देशात अतिश्रीमंतांच्या संख्येत 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये अशा व्यक्तींचा समावेश आहे ज्यांची संपत्ती $30 दशलक्ष (रु. 226 कोटी) आहे. शेअर बाजारातील तेजी आणि डिजिटल क्रांती हे त्याचे प्रमुख कारण मानले जात आहे. अब्जाधीशांच्या संख्येबाबत सांगितले तर भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. 748 अब्जाधीशांसह अमेरिका आघाडीवर आहे, तर चीनमध्ये त्यांची संख्या 554 आहे. तर भारतात त्यांची संख्या 145 आहे.
मालमत्ता मार्गदर्शक संस्था नाईट फ्रँकने प्रसिद्ध केलेल्या द वेल्थ रिपोर्ट-2022 मध्ये असे नमूद केले आहे, की जागतिक पातळीवर अतिश्रीमंतांची संख्या गेल्या वर्षात 9.3 टक्क्यांनी वाढून 6,10,569 वर पोहोचली आहे, जी गेल्या वर्षात याच कालावधीत 5,58,828 होती. अहवालानुसार, भारतात त्यांची संख्या 2021 मध्ये 13,637 पर्यंत वाढली, जी मागील वर्षी 2020 मध्ये 12,287 होती.
अतिश्रीमंत लोकांच्या बाबतीत प्रमुख भारतीय शहरांबद्दल सांगितले तर, बंगळुरू या क्रमवारीत प्रथम आहे. 226 कोटींहून अधिक संपत्ती असलेल्या शहरांमध्ये सर्वाधिक 17.1 टक्के वाढीसह बेंगळुरू, 12.4 टक्क्यांसह दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आणि नऊ टक्क्यांच्या वाढीसह मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे. नाइट फ्रँकने 2026 पर्यंत अशा श्रीमंत लोकांची संख्या 39 टक्क्यांनी वाढून 19,006 पर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. 2016 मध्ये त्यांची संख्या 7,401 होती.
नाइट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांनी सांगितले, की देशातील अतिश्रीमंतांच्या वाढीमध्ये इक्विटी मार्केट आणि डिजिटायजेशनची मोठी भूमिका आहे. अहवालानुसार, देशातील सुमारे 69 टक्के अतिश्रीमंतांच्या संपत्तीत यावर्षी 10 टक्क्यांहून अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षात अतिश्रीमंतांनी त्यांच्या गुंतवणूक करण्यायोग्य संपत्तीपैकी सुमारे 30 टक्के रक्कम पहिले किंवा दुसरे घर खरेदीसाठी गुंतवणूक केली.
तर 22 टक्के गुंतवणूक करण्यायोग्य पैशांचा वापर व्यावसायिक मालमत्ता खरेदी करण्यासाठी केला गेला. आठ टक्के मालमत्ता अप्रत्यक्षपणे व्यावसायिक मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरली गेली, तर आठ टक्के गुंतवणूक करण्यायोग्य मालमत्ता परदेशात मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरली गेली, असे या अहवालात म्हटले आहे.
रशिया-युक्रेन युद्धाचा असाही इफेक्ट..! एकाच झटक्यात श्रीमंतांचे तब्बल 3 लाख कोटी पाण्यात