बाब्बो.. एकाच चार्जमध्ये तब्बल 300 किलोमीटर चालणार ही स्कूटर; पहा, कसा घडणार ‘हा’ चमत्कार; कंपनीने काय केलीय आयडीया..?
मुंबई : इंधनाच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्याने इलेक्ट्रिक वाहनांना मागणी वाढत आहे. तरी देखील दूर अंतराच्या प्रवासासाठी इलेक्ट्रिक वाहनांना मर्यादा येत असल्याचे सांगितले जाते. वाहन कंपन्यांच्याही हे लक्षात आले आहे. त्यामुळे कंपन्या यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. काही कंपन्यांना यामध्ये यशही येत आहे.
सिंपल वन कंपनीने एक जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये आणली आहे. सिंपल एनर्जीने मंगळवारी एका अतिरिक्त बॅटरी पॅकची घोषणा केली. या बॅटरी पॅकमुळे कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूरटची ड्रायव्हिंग रेंज वाढणार आहे. नवीन बॅटरी पॅकसह, ही स्कूटर 300 किमी पर्यंत प्रवास करू शकते. म्हणजेच, एका चार्जमध्ये तुम्ही मुंबई-पुणे-मुंबई असा प्रवास सहज करू शकाल.
सिंपल वन आदर्श परिस्थितीत 236 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देते, असा दावा कंपनीने केला आहे. परंतु 1.6kWh चा हा अतिरिक्त बॅटरी पॅक जोडल्यानंतर ही श्रेणी आणखी वाढ करता येऊ शकते. सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटर अपग्रेड केली जाईल. ज्यामध्ये 8.5kW पर्यंत मोटर दिली जाऊ शकते. ही मोटर 72 Nm चा पीक टॉर्क जनरेट करू शकते. या स्कूटरमध्ये फास्ट चार्जिंगचा पर्यायही उपलब्ध असेल. यामध्ये अनेक स्मार्ट फीचर्स देखील देण्यात आले आहेत, ज्यामध्ये स्मार्ट नेव्हिगेशन सारखे फीचर्स देखील आहेत. या स्कूटरमध्ये रायडिंग मोड, फोन अॅप, कॉल आणि म्युझिक कंट्रोलची वैशिष्ट्ये आहेत.
मूळ प्रकाराची किंमत 1.09 लाख रुपये आहे, परंतु जर तुम्ही अतिरिक्त बॅटरी बॅकअप पर्याय विकत घेतला तर त्याची किंमत 1.45 लाख रुपये (एक्स-शोरूम) असेल. त्याची बुकिंग फक्त 1947 रुपयांमध्ये करता येते आणि वितरण जूनपासून सुरू होऊ शकते. सिंपल वनची ड्रायव्हिंग रेंज इतर इलेक्ट्रिक स्कूटरपेक्षा खूप जास्त आहे. ही स्कूटर Ola S1 Pro आणि Ather सारख्या स्कूटरबरोबर स्पर्धा करते, जे सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटर्सना त्यांची गुणवत्ता, डिझाइन आणि वैशिष्ट्यांसह कठीण स्पर्धा देतात. Ather च्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये रिव्हर्स गियरचा पर्याय देखील देण्यात आला आहे.