Take a fresh look at your lifestyle.

मार्चमध्ये फक्त LIC नाही तर ‘या’ कंपन्यांचेही आयपीओ येणार; पहा, कशी मिळणार पैसे कमाईची संधी..?

मुंबई : मार्च महिना सुरू झाला आहे. या महिन्यात भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (LIC) IPO लाँच होणार आहे. एलआयसीप्रमाणेच काही अन्य कंपन्याही मार्चमध्ये आयपीओ घेऊन येऊ शकतात. कोणत्या कंपन्यांनी SEBI कडे कागदपत्रे सादर केली आहेत आणि त्यांची मान्यता आणि लाँच होणे मार्चमध्ये अपेक्षित आहे, असे सांगण्यात येत आहे. मात्र, आता युक्रेन आणि रशियातील युद्धाने जगातील प्रत्येक देशाचे टेन्शनमध्ये वाढ केली आहे. कारण, या युद्धाचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होत आहे. अशा परिस्थितीत कंपन्या काय निर्णय घेतात हे पाहणे देखील तितकेच महत्वाचे राहणार आहे.

Advertisement

बिकाजी फूड्स इंटरनॅशनलने 1,000 कोटी रुपयांच्या IPO साठी सेबीकडे कागदपत्रे सादर केली आहेत. कंपनीचे 2,93,73,984 समभाग विकण्याची योजना आहे. हे समभाग रतन अग्रवाल आणि दीपक अग्रवाल या दोन प्रवर्तकांकडून विकले जातील. आर्कियन केमिकल इंडस्ट्रीजने SEBI कडे 2,200 कोटी रुपयांची IPO कागदपत्रे सादर केली आहेत. आर्कियन हा विशेष प्रकारच्या समुद्री रसायनांचा निर्माता आहे. IPO अंतर्गत 1,000 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जातील.

Advertisement

याशिवाय, मॅक्लिओड फार्मास्युटिकल्स, टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन्स आणि हर्षा इंजिनियर्स इंटरनॅशनल लिमिटेड यांनीही सेबीकडे कागदपत्रे सादर केली आहेत. तसेच Kids Clinic इंडिया लिमिटेड, Cogent ई-सर्व्हिस लिमिटेड, Inox ग्रीन एनर्जी सर्व्हिस लिमिटेड, Ethos लिमिटेड या कंपन्याही लवकरच आयपीओ आणण्याची तयारी करत आहेत.

Advertisement

मागील वर्ष आयपीओच्या दृष्टीने उत्तम होते. त्यावेळी 65 कंपन्यांनी IPO मधून 1.35 लाख कोटी रुपये उभे केले होते. या वर्षीही अनेक कंपन्या त्यांचे IPO आणणार आहेत. गुंतवणूकदारांसाठी पैसे कमावण्याची ही चांगली संधी आहे. तुम्हालाही IPO मध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही कंपन्यांच्या सार्वजनिक ऑफरद्वारे चांगला नफा मिळवू शकता.

Advertisement

सात कंपन्यांचे आयपीओ लवकरच येत आहेत. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीचा आयपीओ सर्वाधिक प्रतीक्षेत आहे, जो 11 मार्च रोजी येण्याची शक्यता आहे. यामध्ये अँकर गुंतवणूकदारांना प्रथम संधी मिळेल. त्यानंतरच सामान्य गुंतवणूकदार ते खरेदी करू शकतील. मार्चमध्ये, LIC व्यतिरिक्त, SBI Mutual Fund, Byju’s, Ola यासह अनेक कंपन्या त्यांचे IPO आणत आहेत.

Advertisement

धन की बात..! ‘एलआयसी आयपीओ’मध्ये सूट हवीय, मग लगेच करा हे काम..!

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply