Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

महागाई काय अन् कोरोना काय..! तरीही सरकारची चांदीच; पहा, फेब्रुवारी महिन्यात किती मिळालाय जीएसटी..?

मुंबई : सध्याच्या वाढत्या महागाईच्या दिवसात केंद्र सरकारसाठी दिलासा देणारी बातमी आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये, जीएसटी संकलन तब्बल 1,33,026 कोटी रुपये झाले आहे. जीएसटी वसुलीचा हा आकडा फेब्रुवारी 2021 च्या तुलनेत 18 टक्के अधिक आहे. त्याच वेळी, फेब्रुवारी 2020 च्या तुलनेत 26 टक्के संकलन वाढले आहे. सलग पाचव्या महिन्यात जीएसटी संकलन 1.30 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

Advertisement

फेब्रुवारीमध्ये CGST कलेक्शन 24,435 कोटी रुपये, SGST कलेक्शन 30,779 कोटी, IGST कलेक्शन 67,471 कोटी आणि अन्य कर 10,340 कोटी रुपये आहे. फेब्रुवारी महिन्यात नियमित सेटलमेंटनंतर केंद्र सरकारचा महसूल 50,782 कोटी रुपये झाला आहे. या दरम्यान राज्यांचा एकूण महसूल 52,688 कोटी रुपये झाला आहे.

Advertisement

अर्थ मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, जीएसटीच्या इतिहासातील हे तिसरे सर्वाधिक संकलन आहे. या वर्षाच्या जानेवारीमध्ये सरकारने जीएसटीमधून 1,40,986 कोटी रुपयांची कमाई केली होती, जी आतापर्यंतची सर्वाधिक वसुली आहे. याआधी, एप्रिल 2021 मध्ये, जीएसटी संकलन 1,39,708 कोटी रुपये होते, जे दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी वसुली आहे. यानंतर, फेब्रुवारी 2022 मध्ये, सरकारने तिसऱ्यांदा सर्वाधिक 133026 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Loading...
Advertisement

एप्रिल मध्ये जीएसटी संकलन 1,39,708 कोटी रुपये होते. जुलै 2021 मध्ये 1,16,393 कोटी, ऑगस्ट 1,12,020 कोटी, सप्टेंबर 1,17,010 कोटी, ऑक्टोबर 1,30,127 कोटी, नोव्हेंबर 1,31,526 कोटी, डिसेंबर 1,29,780 कोटी, जानेवारी 2022 मध्ये 1,40,986 कोटी तर फेब्रुवारी महिन्यात जीएसटी संकलन तब्बल 1,33,026 कोटी रुपये राहिले.

Advertisement

जीएसटी संकलनात ही वाढ अशा वेळी झाली आहे जेव्हा कोरोनामुळे जानेवारीमध्ये काही राज्यांमध्ये निर्बंध लादण्यात आले होते. कोविड-19 च्या तिसर्‍या लाटेचा फारसा परिणाम झालेला नाही आणि चौथी तिमाही सुद्धा चांगली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, सोमवारी आलेल्या अर्थव्यवस्थेच्या आकडेवारीवर नक्कीच परिणाम झाला. तिसऱ्या तिमाहीत जीडीपी वाढ 5.4 टक्के होती, जी दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत 3 टक्के कमी होती.

Advertisement

बजेटपूर्वीच मोदी सरकारसाठी आली आनंदाची बातमी, ‘जीएसटी’ संकलनातून घसघशीत कमाई..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply