Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

इलेक्ट्रिक स्कूटर घेताय..? जरा थांबा..! आता लवकरच येणार हिरोची इलेक्ट्रिक स्कूटर; पहा, काय आहे कंपनीचे नियोजन..

मुंबई : सध्या अनेक कंपन्या इलेक्ट्रिक वाहने मार्केटमध्ये आणत आहेत. अनेक दिग्गज कंपन्याही या क्षेत्रात दाखल झाल्या आहेत. बजाज, होंडा नंतर आता हिरो कंपनीनेही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याचे निश्चित केले आहे. Hero Motocorp देशात आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच लाँच करणार आहे. कंपनीने गेल्या वर्षात ऑगस्टमध्ये या स्कूटरचा प्रोटोटाइप सादर केला होता. कंपनीच्या या पहिल्या ईव्हीचे उत्पादन आंध्र प्रदेशातील प्रकल्पामध्ये सुरू होईल. ही स्कूटर परदेशात विकल्या जाणाऱ्या गोगोरो रेंजसारखीच असेल.

Advertisement

आगामी इलेक्ट्रिक स्कूटरचा प्रोटोटाइप मिड माउंटेड इलेक्ट्रिक मोटर आणि सिंगल साइड रिअर सस्पेंशनसह येईल. गेल्या तिमाहीत कंपनीने 12.92 लाख युनिट्सची विक्री केली होती. किंमतीबद्दल अशी माहिती देण्यात आली आहे की हीरो इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत इतर अनेक ब्रँडच्या तुलनेत अधिक आकर्षक असू शकते. ज्यामुळे लोक या स्कूटरची जास्त प्रमाणात खरेदी करतील. कंपनीने आधीच खात्री केली आहे की ती अनेक नवीन उत्पादने लाँच करणार आहे. मात्र, याबाबत आधिक माहिती कंपनीने दिलेली नाही.

Advertisement

हिरोने चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडबरोबर भागीदारी केली आहे. यामुळे दुचाकी चार्जिंगसाठी पायाभूत सुविधा निर्माण होण्यास मदत होईल. हिरोचे मुख्य प्रतिस्पर्धी बजाज ऑटो आणि टीव्हीएस मोटर्स असतील आणि या कंपन्या इलेक्ट्रिक मार्केटमध्ये दाखल झाल्या आहेत, तर होंडा आणि सुझुकी अजूनही या मार्केटपासून दूर आहेत.

Loading...
Advertisement

परंतु, आता या कंपन्याही मार्केटमध्ये लवकरच दाखल होण्याची तयारी करत आहेत. देशातील इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये प्रवेश करणार्‍या हिरोला पुढे जाण्याचा मार्ग नक्कीच सोपा नसेल कारण मार्केटमध्ये आधीपासूनच ओलो इलेक्ट्रिक, सिंपल वन, ओकिनावा आणि कोमाकी सारखे ब्रँड आहेत, जे अनेक इलेक्ट्रिक स्कूटर पर्याय देतात.

Advertisement

ओला कंपनीकडे सध्या दोन इलेक्ट्रिक स्कूटर आहेत, जे ओला एस1 आणि ओला एस1 प्रो आहेत. दुसरीकडे, सिंपल आणि एथर सारख्या इलेक्ट्रिक स्कूटर आहेत. सिंपल वन येथे उत्तम ड्रायव्हिंग रेंज ऑफर करण्यात मदत करते, तर एथरला रिव्हर्स गियर सारखी आधुनिक वैशिष्ट्ये मिळतात. या स्कूटर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून बुक करता येतात.

Advertisement

हिरो इलेक्ट्रिकला धक्का..! ‘या’ कंपनीच्या स्कूटरची रेकॉर्ड ब्रेक विक्री; पहिला नंबरही मिळवलाय..

Advertisement
Advertisement

Leave a Reply