Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Ukraine-Russia War Effect : बाब्बो.. व्यावसायिक गॅस सिलिंडर आजपासून मिळणार इतक्या रुपयांना

मुंबई : युक्रेनच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर आजपासून म्हणजेच १ मार्चपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे नवीन दर जारी करण्यात आले आहेत. सिलिंडरच्या दरात 105 रुपयांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर पाच राज्यांतील निवडणुका संपताच घरगुती एलपीजी सिलिंडरही महागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी एलपीजी सिलेंडरची किंमत दर महिन्याला सुधारित केली जाते.

Advertisement

व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ झाल्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट चालवणाऱ्या व्यावसायिकांच्या खिशाला अधिक फटका बसणार आहे. 19 किलोचा LPG सिलेंडर 1 मार्चपासून म्हणजेच आजपासून दिल्लीत 1907 रुपयांऐवजी 2012 रुपयांना मिळणार आहे. कोलकात्यात आता 1987 ऐवजी 2095 रुपयांना मिळणार आहे, तर मुंबईत त्याची किंमत आता 1857 रुपयांवरून 1963 रुपयांपर्यंत वाढली आहे.

Loading...
Advertisement

गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या दरातही वाढ करण्यात आली होती. ऑक्टोबर 2021 ते 1 फेब्रुवारी 2022 दरम्यान व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 170 रुपयांनी वाढ झाली आहे. 1 ऑक्टोबर 2021 रोजी दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1736 रुपये होती जी नोव्हेंबरमध्ये 2000 रुपये झाली. डिसेंबरमध्ये 101 रुपयांनी वाढ झाली होती.

Advertisement

मात्र, जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये दरात कपात झाली. 6 ऑक्टोबर 2021 नंतर घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणतीही कपात किंवा वाढ झालेली नाही. मात्र, या काळात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $102 ने वाढल्या.

Advertisement
Advertisement

Leave a Reply