Russia-Ukraine War : रशिया विरोधात अमेरिकेची मोठी कारवाई.. पहा, रशियाचे कसे होणार आर्थिक नुकसान..?
दिल्ली : रशियाने युक्रेन विरुद्ध युद्ध सुरू केल्यानंतर रशियाच्याही अडचणी वाढल्या आहेत. जगभरातील देश रशियाच्या विरोधात आले आहेत आणि कठोर निर्बंध टाकत आहेत. यामध्ये आता अमेरिकेने पुन्हा नव्याने काही निर्बंध टाकले आहेत. अमेरिकेने सोमवारी रशियाच्या मध्यवर्ती बँक आणि राज्य गुंतवणूक निधीवर नवीन निर्बंध टाकले. अमेरिकेने रशियाच्या मध्यवर्ती बँकेबरोबरच्या सर्व व्यवहारांवर बंदी जाहीर केली आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने पत्रकारांना सांगितले की, अमेरिकेच्या कोषागार विभागाने रशियाच्या अर्थव्यवस्थेबाबत घेतलेला हा महत्वाचा निर्णय आहे.
जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, इटली, जपान, युरोपियन युनियन आणि इतर देश अमेरिकेसह निर्बंधांद्वारे रशियाच्या मध्यवर्ती बँकेला लक्ष्य करत आहेत. अमेरिकेच्या कोषागार विभागाच्या म्हणण्यानुसार, या हालचालींमुळे, रशियन सेंट्रल बँक अमेरिका किंवा कोणत्याही अमेरिकन संस्थेकडून कोणताही निधी उभारू शकणार नाही. जो बिडेन प्रशासनाच्या म्हणण्यानुसार या निर्णयामुळे रशियाच्या अब्जावधी डॉलर्सच्या निधीवर विपरित परिणाम होईल.
रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाने जग दोन गटात विभागले आहे. एकीकडे भारतासारखा देश तटस्थ राहण्याचा प्रयत्न करत आहे, तर चीन आणि पाकिस्ताननेही अंतर ठेवले आहे. याशिवाय अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी असे पाश्चिमात्य आणि युरोपीय देश उघडपणे रशियाच्या विरोधात आले आहेत. यातील अनेक देशांनी युक्रेनला लष्करी शस्त्रे आणि इतर मदत देण्याचे सांगितले आहे. नाटो प्रमुखांनी सोमवारी युक्रेनला रणगाडाविरोधी शस्त्रे आणि क्षेपणास्त्रांचा पुरवठा करण्याची घोषणा केली. आतापर्यंत एकूण 21 देशांच्या वतीने युक्रेनला मदत जाहीर करण्यात आली आहे.
युक्रेनला शस्त्रे खरेदी करता यावीत यासाठी अमेरिकेने युक्रेनला $350 ची अतिरिक्त मदत जाहीर केली आहे. गेल्या वर्षभरात अमेरिकेने युक्रेनला ही मोठी मदत केली आहे. युद्धानंतरही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी अमेरिकन सैन्य युक्रेनमध्ये जाणार नाही, मात्र सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी घोषणा केली आहे.
बाब्बो.. रशियाच्या विरोधात तब्बल 21 देशांची युक्रेनला मदत; पहा, कोणत्या देशाने काय केली घोषणा..?