Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

खरेदीदारांना झटका..! म्हणून पुन्हा कारच्या किंमती वाढण्याची शक्यता; पहा, काय आहे मोठे कारण..?

मुंबई : गेल्या वर्षी वेगवेगळ्या वाहन कंपन्यांनी कारच्या किंमतीत अनेक वेळा वाढ केली. या वर्षातही इंधनाच्या वाढत्या किमती आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील वाढत्या खर्चामुळे किंमतीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे देशांतर्गत तेल विपणन कंपन्या लवकरच देशात दरवाढीची घोषणा करतील असे अपेक्षित आहे.

Advertisement

केंद्र सरकारने गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या सुरुवातीला उत्पादन शुल्कात कपात करण्याची घोषणा केल्यानंतर देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर आहेत. यानंतर राज्य सरकारांनी व्हॅट कमी केला. मात्र, पूर्व युरोपमध्ये सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वेगाने वाढत आहेत.

Advertisement

ICRA च्या अहवालानुसार, जागतिक बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किमतींच्या तुलनेत भारतातील देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रति लिटर 8 रुपयांनी कमी आहेत. जागतिक कच्च्या तेलाच्या किमती आधीच प्रति बॅरल 107 डॉलरच्या पुढे गेल्या आहेत, जे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीमधील सात वर्षांतील रेकॉर्ड ठरले आहे.

Loading...
Advertisement

यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे कच्च्या मालाची किंमत वाढेल. आंतरराष्ट्रीय बाजारात अॅल्युमिनियमची कमतरता, सेमी कंडक्टर टंचाई आणि इतर पुरवठा साखळीतील व्यत्यय यांचाही वाहनांच्या किमतीवर परिणाम होणार आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेला संघर्ष देशातील खाजगी वाहन खरेदीदारांसाठी दुहेरी धक्का देणारा ठरू शकतो, कारण किंमती वाढू शकतात. त्यामुळे आगामी काळात वाहने खरेदी करणे नागरिकांसाठी खर्चिक ठरण्याचीच जास्त शक्यता आहे. वाहन कंपन्यानी किंमतीत कधी वाढ करतील याबाबत अद्याप काहीही स्पष्ट नाही. तर दुसरीकडे निवडणुकीनंतर इंधनाच्या किंमती वाढणार असल्याचे अंदाज व्यक्त होत आहेत.

Advertisement

इलेक्ट्रिक वाहनांचे प्रदूषण थांबणार..! ‘या’ दोन दिग्गज कंपन्या सुरू करणार ‘हा’ जबरदस्त स्टार्टअप

Advertisement
Advertisement

Leave a Reply