रेल्वेची मोठी घोषणा..! प्रवाशांसाठी सुरू करणार ‘इतक्या’ स्पेशल ट्रेन; पहा, काय आहे रेल्वेचे नियोजन..
दिल्ली : रेल्वे मंत्रालयाने होळी सणाआधी देशातील लाखो रेल्वे प्रवाशांना आणखी एक खुशखबर दिली आहे. रेल्वे मंत्रालयाने रेल्वे फेऱ्यांबाबत एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाचा फायदा उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, झारखंडसह अनेक राज्यांतील रेल्वे प्रवाशांना होणार आहे. उद्या म्हणजेच 1 मार्चपासून त्या सर्व रेल्वे पुन्हा रुळावर येणार आहेत ज्या धुक्यामुळे रद्द करण्यात आल्या होत्या. हिवाळ्यात धुक्यामुळे रेल्वेने 100 हून अधिक रेल्वे रद्द केल्या होत्या, मात्र आता या सर्व रेल्वे नेहमीप्रमाणेच चालणार आहेत. याबरोबरच होळीच्या दिवशी 250 विशेष रेल्वे चालवण्यात येणार आहेत.
यामुळे होळी आणि उन्हाळ्याच्या सुटीत घरी जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांचा त्रास बराच कमी होणार आहे. तसेच त्यांना रेल्वेचे तिकीट मिळण्यातील अडचणी कमी होणार आहेत, असे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे. इतकेच नाही तर होळीसाठी रेल्वे 250 विशेष रेल्वे चालवणार आहे. या रेल्वे कोणत्या असतील, कोणत्या मार्गांवर चालवल्या जातील याबाबत लवकरच घोषणा करण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या गाड्या 7 मार्च ते 20 मार्च दरम्यान सुरू राहणार आहेत.
तथापि, विशेष रेल्वेचे प्रवास भाडे इतर मेल एक्सप्रेस रेल्वेंच्या तिकीट दरापेक्षा 30 टक्के जास्त असेल. पण, या रेल्वे प्रवाशांसाठी होळीची सणात मदत करणार आहेत. कोविड-19 पासून रेल्वे सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. हिवाळ्यातही धुक्यामुळे बऱ्याच फेऱ्या रद्द कराव्या लागल्या होत्या. पण, आता या सेवा सामान्य झाल्यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठी मदत होणार आहे. रेल्वे प्रवाशांच्या सुविधा लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने अनेक मेल आणि एक्स्प्रेस रेल्वे चालवण्याची घोषणा केली आहे.