Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

टेन्शनच म्हणायचे..! जीडीपीने दिला मोठा झटका.. डिसेंबर तिमाहीत ‘तो’ अंदाजही ठरला फेल..

मुंबई : चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत म्हणजेच ऑक्टोबर-डिसेंबर दरम्यान देशाचा जीडीपी (Gross Domestic Product) वाढीचा दर 5.4 टक्के होता. बाजाराच्या 5.9 टक्क्यांच्या अंदाजापेक्षा हे कमी आहे. बरोबर एक वर्षाआधी डिसेंबर तिमाहीत, भारताचा विकास दर 0.40 टक्के होता. या तिमाहीत वाढ मंदावली. सप्टेंबरच्या तिमाहीत देशाचा विकास दर 7.5 टक्के होता. सांख्यिकी मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. चालू आर्थिक वर्षात देशाची अर्थव्यवस्था (Economy) केवळ 8.9 टक्के दराने वाढेल, असे या अहवालात म्हटले आहे. याआधी हा अंदाज 9.2 टक्के ठेवण्यात आला होता. डिसेंबर तिमाहीतील ही वाढीची आकडेवारी अंदाजापेक्षा अत्यंत कमी आहे.

Advertisement

बार्कलेजने या तिमाहीत 6.6 टक्के जीडीपी वाढीचा अंदाज व्यक्त केला होता. चालू आर्थिक वर्षात विकास दर 10 टक्के राहील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला होता. एसबीआय रिसर्चने (SBI Research) डिसेंबर तिमाहीत विकास दर 5.8 टक्के असेल असा अंदाज व्यक्त केला होता. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कमकुवत तुलनात्मक पायामुळे अर्थव्यवस्थेचा विकास दर 20.3 टक्के होता. दुसऱ्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर 7.5 टक्के होता. उल्लेखनीय आहे की ऑक्टोबर-डिसेंबर 2021 या तिमाहीत चीनचा आर्थिक विकास दर चार टक्के राहिला आहे.

Advertisement

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेमुळे जानेवारीमध्ये मुख्य उद्योग वाढीचा वेग मंदावला आहे. जानेवारीमध्ये आठ प्रमुख क्षेत्रांचा विकास दर 3.7 टक्के होता, तर डिसेंबरमध्ये तो 4.1 टक्के होता. चालू आर्थिक वर्षात एप्रिल-जानेवारी दरम्यान मुख्य उद्योगांचा विकास दर 11.6 टक्के होता, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत -8.6 टक्के होता.

Loading...
Advertisement

जानेवारी 2022 मध्ये आठ प्रमुख उद्योगांचे उत्पादन 3.7 टक्क्यांनी वाढले. वर्षभरापूर्वी याच काळात मूलभूत उद्योगांचा विकास दर 1.3 टक्के होता. सोमवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, कोळसा, नैसर्गिक वायू आणि सिमेंट क्षेत्राच्या चांगल्या कामगिरीमुळे मूलभूत उद्योगांचे उत्पादन चांगले झाले आहे. तथापि, कच्चे तेल आणि खतांच्या उत्पादनात जानेवारीमध्ये घट झाली. मूलभूत उद्योगांचे उत्पादन डिसेंबर 2021 मध्ये 4.1 टक्क्यांनी वाढले.

Advertisement

कोळसा, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने, खते, पोलाद, सिमेंट आणि ऊर्जा क्षेत्राचा विकास दर 11.6 टक्के राहिला आहे. त्यामुळे मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत मूलभूत उद्योगांचे उत्पादन 8.6 टक्क्यांनी घटले होते. आकडेवारीनुसार, जानेवारीमध्ये कोळशाच्या उत्पादनात 8.2 टक्के, नैसर्गिक वायूच्या उत्पादनात 11.7 टक्के, रिफायनरी उत्पादनांमध्ये 3.7 टक्के आणि सिमेंटच्या उत्पादनात 13.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Advertisement

चिंताजनक : भारताचा ‘जीडीपी’ घसरणार, पाहा किती असेल यंदा विकासदर..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply