Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

म्हणून ‘अमूल’नेही दिलाय ग्राहकांना झटका; पहा उद्यापासून काय होणार आहे ते

Please wait..
Loading...

मुंबई : सोमवारी आणखी एक मोठा महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. कारण दूध उत्पादक कंपनी अमूल (Amul Milk Rate Increased) यांनी आपल्या दुधाच्या दरात 2 रुपयांची वाढ केली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार, 1 मार्चपासून नवीन दर लागू होतील. अमूलने एका प्रसिद्धीद्वारे ग्राहकांना ही माहिती दिली आहे. यावेळी गुजरात सहकारी दूध पणन महासंघाने एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच दरात वाढ केली आहे. अमूल कंपनीच्या नवीन किमती संपूर्ण भारतात लागू होतील. अमूलने अमूल गोल्ड, अमूल शक्ती आणि अमूल ताझा या सर्व दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीत वाढ केली आहे. ऊर्जा, पॅकेजिंग, वाहतूक आणि पशुखाद्याच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे दूध दरात वाढ झाल्याचे अमूलने म्हटले आहे. होणारी भाववाढ अशी :

Advertisement
प्रकार वजन जुना भाव (रुपये) वाढलेला भाव (रुपये)
अमूल डायमंड 500 मिली 31 33
अमूल डायमंड 1 लीटर 61 63
अमूल म्हशीचे दूध 500 मिली 30 32
अमूल म्हशीचे दूध 1 लीटर 59 61
अमूल गोल्ड 500 मिली 29 31
अमूल गोल्ड 1 लीटर 57 59
अमूल गोल्ड 2 लीटर 112 114
अमूल गाय दूध 500 मिली 25 27
अमूल गाय दूध 1 लीटर 49 51
अमूल ताजा 500 मिली 24 26
अमूल ताजा 1 लीटर 47 49
अमूल ताजा 2 लीटर 92 94
अमूल स्लिम ऐन ट्रिम 500 मिली 21 23
अमूल स्लिम ऐन ट्रिम 1 लीटर 41 43

Advertisement
Advertisement

Leave a Reply