Take a fresh look at your lifestyle.

Onion Update: युद्धभीतीच्या चक्रव्यूह कांदा उत्पादक..! पहा कशी आहे ही फक्त अंधश्रद्धा..!

पुणे : कांद्याचे भाव (Onion rate in Maharashtra) वाढले की ते कमी करण्यासाठी काहीतरी कुभांड रचण्यात भारतीय व्यापारी आणि सरकारी यंत्रणा मागे नाहीत. त्याचा फटका वेळोवेळी कांदा उत्पादकांना बसला आहे. आताही रशिया आणि युक्रेन (Russia-Ukraine war) यांच्या युद्धाचा बाऊ करून बाजारात कांद्याचे भाव पाडण्याचे षडयंत्र रचण्यात आले आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत चालू आठवड्यात पहिल्याच दिवशी कांद्याचे भाव लासलगाव (Lasalgaon, nashik) आणि काही मार्केटमध्ये 500 रुपयांनी खाली आल्यावर अशा बातम्या पेरल्या जात आहेत.

Advertisement

मात्र, सध्या भारतीय कांद्याची विशेष काही निर्यात चालू नाही आणि जी चालू आहे तिचा एकूण बाजारातील टक्का खूप कमी आहे. कांदा निर्यातीत जगभरात भारताचा नंबर तिसरा आहे. India’s Position In The Global Market for (apeda.gov.in) नेदरलंड (16.96) आणि मेक्सिको (12.18) हे देश याबाबत भारताच्या खूप पुढे आहेत. Exports From India of Fresh Onions (apeda.gov.in) कांदा निर्यातीत भारताचा एकूण वाटा फक्त 8.5 टक्के आहे. कारण भारतात देशांतर्गत बाजारात खूप मोठ्या प्रमाणावर कांद्याची गरज आहे. भारतीय कांदा रस्त्याच्या मार्गाने बांगलादेश या देशात मोठ्या प्रमाणात जातो. मग काही प्रमाणात अखाती देश आणि इतर भागात कांदा जातो. सध्या युरोप आणि रशिया यांच्याकडे निर्यात होण्यात खूप नगण्य वाटा आहे. तरीही जागतिक युद्धाचा बाऊ करून कांद्याचे भाव पडण्याचे षडयंत्र व्यापाऱ्यांनी रचल्याने अनेक कांदा उत्पादकांनी संताप व्यक्त केला आहे. कमी भावात कांदा खरेदी करून पुढे चढ्या भावात विकण्यासाठी हे चक्रव्यूह रचले असल्याचीच शक्यता उत्पादकांना यामुळे वाटत आहे.

Advertisement
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
28/02/2022
कोल्हापूर क्विंटल 11990 400 2100 1300
औरंगाबाद क्विंटल 309 300 2000 1150
मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 15682 1500 2400 1950
श्रीरामपूर क्विंटल 32 650 1800 1150
सातारा क्विंटल 225 1000 2200 1600
कराड हालवा क्विंटल 351 500 2000 2000
सोलापूर लाल क्विंटल 69682 100 3000 1500
येवला लाल क्विंटल 15000 300 2072 1550
धुळे लाल क्विंटल 256 200 2200 1600
लासलगाव लाल क्विंटल 19800 700 2040 1800
जळगाव लाल क्विंटल 1000 660 2500 1580
मालेगाव-मुंगसे लाल क्विंटल 16700 500 1980 1700
नागपूर लाल क्विंटल 2640 2000 2800 2600
राहूरी -वांबोरी लाल क्विंटल 4462 200 2300 1400
मनमाड लाल क्विंटल 6000 400 2030 1700
सटाणा लाल क्विंटल 3730 750 2210 1775
पिंपळगाव(ब) – सायखेडा लाल क्विंटल 9371 400 1975 1661
वैजापूर लाल क्विंटल 622 500 2300 2000
देवळा लाल क्विंटल 5030 350 2315 1850
राहता लाल क्विंटल 1900 600 2500 2050
उमराणे लाल क्विंटल 17500 901 2300 1700
पुणे लोकल क्विंटल 19170 600 2200 1400
पुणे- खडकी लोकल क्विंटल 8 1200 1600 1400
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 8 2500 2500 2500
वाई लोकल क्विंटल 18 1000 2500 1700
नागपूर पांढरा क्विंटल 2000 1400 1800 1700
नाशिक पोळ क्विंटल 2940 650 2400 1850
पिंपळगाव बसवंत पोळ क्विंटल 20300 400 2240 1850
कळवण उन्हाळी क्विंटल 3500 400 2210 1750

Advertisement

Leave a Reply