Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

काम की बात : 1 मार्चपासून होणार ‘हे’ महत्वाचे बदल; पहा, तुमच्यावर कसा होणार परिणाम; वाचा, महत्वाची माहिती..

मुंबई : दर महिन्याच्या पहिल्या दिवशी असे अनेक बदल होतात जे दैनंदिन घडामोडींवर मोठा परिणाम करतात. आताही काही महत्वाचे बदल होणार आहेत. कारण, उद्यापासून मार्च महिन्यास सुरुवात होत आहे. उद्या मंगळवार मार्च महिन्याचा पहिला दिवस आहे. यावेळी एलपीजी गॅस टाकीच्या दरात बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याशिवाय मार्च 2022 मध्ये आणखी काही विशेष बदल होणार आहेत ज्याचा थेट परिणाम तुमच्यावर होईल.

Advertisement

हे लक्षात घेण्यासारखे आहे की एलपीजी सिलिंडरची किंमत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी निश्चित केली जाते. गॅसच्या किमतींचा थेट संबंध सर्वसामान्यांच्या घर खर्चाच्या बजेटशी आहे. अलीकडील काही महिन्यांपासून एलपीजीच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही, त्यामुळे 1 मार्च 2022 रोजी त्याच्या किमतीत बदल अपेक्षित आहे. 1 मार्च रोजी गॅस टाकीच्या किमती वाढतात की त्यांचे दर स्थिर राहतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Advertisement

IPPB म्हणजेच इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने आपल्या डिजिटल बचत खात्यासाठी क्लोजर चार्जेस आकारण्यास सुरुवात केली आहे. तुमचे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत बचत खाते असल्यास तुम्हाला हे शुल्क भरावे लागेल. हे शुल्क 150 रुपये असेल आणि जीएसटी स्वतंत्रपणे भरावा लागेल. बँकेचा हा नवीन नियम 5 मार्च 2022 पासून लागू होणार आहे.

Loading...
Advertisement

आरबीआयने डिजिटल पेमेंटमध्ये मोठे बदल करण्याची तयारी केली आहे. प्रोप्रायटरी QR कोड वापरकर्ते एक किंवा अधिक इंटरऑपरेबल QR कोडवर जातील. ही हस्तांतरण प्रक्रिया 31 मार्च 2022 पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. याबरोबरच रिजर्व्ह बँकेने सांगितले की, कोणताही PSO कोणत्याही पेमेंट व्यवहारासाठी कोणताही नवीन प्रोप्रायटरी कोड लागू करणार नाही.

Advertisement

बँकांच्या एटीएममध्ये पैसे भरण्याचे नियम मार्चमध्ये बदलणार आहेत. रिजर्व्ह बँकेने एटीएमबाबत काही महत्वाच्या नियमांत बदल केला आहे. त्यामुळे हे नियम काय आहेत, त्यामध्ये कोणते बदल झाले आहेत. याची माहिती असणे गरजेचे आहे. कारण, आपल्या प्रत्येकाला नेहमीच एटीएममधून पैसे काढावे लागतात, अशा परिस्थितीत या नियमांची माहिती असणे जास्त आवश्यक आहे.

Advertisement

काम की बात : 1 फेब्रुवारीपासून ‘या’ महत्वाच्या नियमात होणार बदल; जाणून घ्या, महत्वाची माहिती..

Advertisement
Advertisement

Leave a Reply