Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

टाटांना मिस्त्री यांचे आव्हान; 9 मार्चला होणार आहे कोर्टात सुनावणी

मुंबई : टाटा कंपनीच्या (Tata Sons) अंतर्गत वादप्रकरणी सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. या प्रकरणावर दहा दिवसांनी सुनावणी होणार आहे. म्हणजेच आता या प्रकरणावर येत्या महिन्यात म्हणजेच 9 मार्च रोजी न्यायालय सुनावणी करणार आहे. खरं तर, सायरस इन्व्हेस्टमेंटने याचिकेत सर्वोच्च न्यायालयाच्या 26 मार्च 2021 च्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे, ज्यामध्ये न्यायालयाने टाटा सन्सच्या बाजूने निर्णय दिला होता.

Loading...
Advertisement

सर्वोच्च न्यायालयाने २६ मार्च रोजी दिलेल्या निकालात म्हटले होते की, कायद्याचे सर्व प्रश्न टाटांच्या बाजूने आहेत. आपल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की समभागांच्या विवादाबाबत दोन्ही पक्ष कायदेशीर मार्ग स्वीकारू शकतात. एवढेच नाही तर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी कठोर भाष्य करताना सायरस मिस्त्री यांना अध्यक्ष बनवणे ही रतन टाटा (Ratan Tata) यांची सर्वात मोठी चूक असल्याचेही म्हटले होते. या प्रकरणी माजी सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. टाटा समूहाच्या कार्यकारी अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांची हकालपट्टी सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. यासोबतच मिस्त्री यांना टाटा समूहाच्या कार्यकारी अध्यक्षपदी बहाल करण्याचा एनसीएलएटीचा निर्णयही कोर्टाने बाजूला ठेवला आहे. 18 डिसेंबर 2019 रोजी, राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरण (NCLAT) ने सायरस मिस्त्री यांना टाटा समूहाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून बहाल केले होते. CJI NV रमना, न्यायमूर्ती एएस बोपण्णा आणि न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमण्यम यांच्या खंडपीठाने 15 फेब्रुवारी रोजी या प्रकरणावर विचार केला. मात्र, न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमण्यम यांनी अल्पमताच्या निकालात पुनर्विचार याचिका फेटाळण्यात यावी, असे सांगितले.

Advertisement
Advertisement

Leave a Reply