Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

सेबीच्या चेअरमनपदी प्रथमच महिला..! पहा काय आहे त्यांचा नेमका अनुभव

मुंबई : केंद्र सरकारने सोमवारी माधबी पुरी बुच (Madhabi Puri Buch) यांची बाजार नियामक सेबीच्या (SEBI)  नवीन अध्यक्षपदी नियुक्ती केली. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या त्या पहिल्या महिला अध्यक्षा असतील. ICICI सिक्युरिटीजचे माजी प्रमुख बुच यांनी 2017 ते 2021 पर्यंत सेबीचे पूर्णवेळ सदस्य म्हणून काम केले आहे. त्या अजय त्यागी यांची जागा घेतील, ज्यांचा कार्यकाळ आज 28 फेब्रुवारीला संपत आहे.

Advertisement

बुच या खाजगी क्षेत्राशी निगडीत पहिल्या व्यक्ती ठरल्या आहेत ज्या सेबीची सर्वोच्च कमान सांभाळणार आहेत. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात आयसीआयसीआय बँकेतून केली. बुच फेब्रुवारी 2009 ते मे 2011 पर्यंत ICICI बँकेचे MD आणि CEO होते. यानंतर सिंगापूरला त्यांनी ग्रेटर पॅसिफिक कॅपिटल एलएलपीमध्ये (Greater Pacific Capital LLP) प्रमुख भूमिका बजावली. हिमाचल प्रदेश केडरचे 1984 बॅचचे IAS अधिकारी अजय त्यागी यांची 1 मार्च 2017 रोजी सेबीच्या अध्यक्षपदी तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. नंतर ऑगस्ट 2020 मध्ये त्यांचा कार्यकाळ 18 महिन्यांसाठी वाढवण्यात आला होता. वित्त मंत्रालयाने ऑक्टोबर 2021 मध्ये SEBI चेअरमन पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले होते. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 6 डिसेंबर 2021 होती.

Loading...
Advertisement

नियामकांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेनुसार, कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखालील वित्तीय क्षेत्र नियामक नियुक्ती शोध समिती Financial Sector Regulatory Appointments Search Committee (FSRASC) द्वारे उमेदवारांची निवड केली जाते. निवडलेल्या उमेदवारांची आर्थिक व्यवहार सचिव आणि त्या क्षेत्राचे ज्ञान असलेल्या तीन बाह्य तज्ञांच्या पॅनेलद्वारे मुलाखत घेतली जाते. या उच्चस्तरीय पॅनेलने जाहिरात केलेल्या पदासाठी अर्ज केलेल्या व्यक्तींव्यतिरिक्त इतर नावांची शिफारस करण्याचा अधिकार देखील राखून ठेवला आहे. मुलाखतीच्या आधारे, FSRASC पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीला नावांची शिफारस करते, ज्यावर समिती एका नावावर अंतिम निर्णय घेते.

Advertisement
Advertisement

Leave a Reply