Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

प्लान सारखाच पण, खासगी कंपन्या घेतात जास्त पैसे; BSNL चा प्लान ठरतोय स्वस्त; पहा, कोणता प्लान आहे बेस्ट..

मुंबई : जर तुम्ही 56 दिवसांसाठी चांगला डेटा आणि परवडणारा रिचार्ज प्लान शोधत असाल, तर BSNL कडे एक उत्तम पर्याय आहे. कंपनी आपल्या 347 च्या प्लॅनमध्ये 56 दिवसांची वैधता ऑफर करत आहे. विशेष म्हणजे, या प्लानमध्ये दररोज 2GB डेटा मिळतो. याशिवाय, तुम्हाला सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉल आणि 100 SMS सुविधा देखील मिळतात. Jio आणि Airtel सारख्या कंपन्या 500 रुपयांपेक्षा जास्त किमतीत अशा प्रकारच्या प्लानची ऑफर देतात.

Advertisement

जिओचा 533 रुपयांचा प्लॅन
रिलायन्स जिओ 533 रुपयांच्या प्लॅनमध्ये 56 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा देत आहे. अशा प्रकारे तुम्हाला एकूण 112GB डेटा मिळेल. हे सर्व नेटवर्कवर विनामूल्य कॉल आणि दररोज 100 एसएमएस पाठविण्याची सुविधा देखील देते. याशिवाय तुम्हाला जिओ अॅप फ्री सब्सक्रिप्शन दिले जाईल.

Advertisement

एअरटेलचा 549 रुपयांचा प्लान
एअरटेल आपल्या 549 रुपयांच्या प्लॅनमध्ये 56 दिवसांसाठी दररोज 2 GB डेटा देत आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉल आणि दररोज 100 एसएमएस देखील मिळतात. तुम्हाला प्लॅनमध्ये मोफत HelloTunes, Wink Music, Prime Video Mobile Edition मोफत चाचणी सारखे फायदे देखील मिळतात.

Loading...
Advertisement

Vodafone idea 539 रुपयांचा प्लॅन
Jio आणि Airtel प्रमाणे, Vi देखील ही सुविधा त्यांच्या 539 रुपयांच्या प्लॅनमध्ये देते. यामध्ये 56 दिवसांसाठी दररोज 2 GB डेटा, अमर्यादित कॉल आणि 100 SMS मिळतात. याशिवाय वीकेंड डेटा रोलओव्हर, Vi Movies & TV Classic सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

Advertisement

वाव.. देशातील पहिलाच प्रीपेड प्लान..! फक्त 7 रुपयांत 5GB डेटा; तीन महिने रिचार्जचे टेन्शन विसरा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply