Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Russia-Ukraine War : रशियासाठी चीनने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; अमेरिकेवर केलाय मोठा आरोप..

दिल्ली : युक्रेन विरोधात युद्धा सुरू केल्यानंतर (Russia-Ukraine War) जगातील अनेक देश रशियावर कमालीचे संतापले आहेत आणि विविध प्रकारचे निर्बंध टाकत आहेत. एकीकडे जगातील बहुतांश देश रशियाच्या आक्रमक धोरणाच्या विरोधात असताना, दुसरीकडे चीन रशियाच्या बाजूने उभा असल्याचे दिसत आहे. यामुळेच रशियावर टाकलेले सर्व गहू आयात निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्टने वृत्त दिले आहे, की चीनमध्ये आता रशियन गव्हाच्या वितरणासाठी कोणतेही निर्बंध असणार नाहीत. कारण आयातीवरील सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत.

Advertisement

वृत्तपत्रानुसार, चीनने उचललेले हे पाऊल रशियाच्या अर्थव्यवस्थेला संजीवनी देऊ शकते. कारण युरोपियन युनियन आणि अमेरिकेने रशियावर अनेक कठोर आर्थिक निर्बंध टाकले आहेत. या निर्णयामुळे चीनच्या अन्न सुरक्षेलाही चालना मिळणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या बीजिंग दौऱ्यादरम्यान चीनने रशियाकडून आयातीला परवानगी देण्याचे मान्य केले. युक्रेनमधील युद्धामुळे गेल्या आठवड्यात गव्हाच्या जागतिक किमतीत मोठी वाढ झाली होती.

Advertisement

रशिया हा जगातील आघाडीचा गहू निर्यातदार देश मानला जातो. जागतिक गव्हाच्या निर्यातीत रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांचा वाटा सुमारे एक तृतीयांश आहे. अशा परिस्थितीत रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे जगभरातील अन्न पुरवठा साखळी प्रभावित किंवा विस्कळीत होऊ शकते. युक्रेनमधील युद्धासाठी रशियाला जबाबदार धरण्यास चीनने स्पष्टपणे नकार दिला आहे. मात्र, बीजिंगने या मुद्द्यावर दोन्ही बाजूंनी संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. युद्ध जास्त भडकवण्याचे काम अमेरिकेने केले आहे, असा आरोप चीनने अमेरिकेवर केला.

Loading...
Advertisement

युक्रेन संकटामुळे अमेरिका भीती आणि दहशत निर्माण करत असल्याचा आरोप चीनने केला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त्यांनी सांगितले की, चीन रशियावर टाकलेल्या निर्बंधांच्या विरोधात आहे आणि त्याला विरोध करतो. युक्रेनच्या बॉर्डरभोवती रशियन सैन्याची तैनाती आणि हिंसक युद्धाची शक्यता यामुळे अमेरिका युक्रेनला शस्त्रे देऊन परिस्थिती अधिक गंभीर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केली.

Advertisement

Russia-Ukraine War : ‘त्या’ मुद्द्यावर चीनने दिलाय ‘हा’ इशारा.. पहा, नेमके काय म्हटलेय चीनने.?

Advertisement
Advertisement

Leave a Reply